आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes Series: Kangaroo Give Tough Answer To England

अॅशेस मालिका : इंग्लंडला कांगारूंनी दिले दमदार प्रत्युत्तर, मिशेल स्टार्कने घेतले पाच बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच बळी घेणाऱ्या मिशेल स्टार्कचे अभिनंदन करताना मिलेश जॉन्सन. - Divya Marathi
पाच बळी घेणाऱ्या मिशेल स्टार्कचे अभिनंदन करताना मिलेश जॉन्सन.
कार्डिफ - अॅशेस मालिकेत यजमान इंग्लंडविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात अखेरचे वृत्त हाती आले तो पर्यंत २५ षटकांत १ बाद ९५ धावा करत दमदार सुरूवात केली. कालच्या ७ बाद ३४३ धावांच्या पुढे खेळताना इंग्लंडने ४३० धावा केल्या. तळातील फलंदाज मोईन अलीने शानदार अर्धशतक झळकावत संघाची धावसंख्या चारशे पार नेली. त्याने ८८ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि १ षटकार खेचत ७७ धावा काढल्या. ब्रॉडने २६ चेंडूत १८ धावा जोडल्या. जेम्स अ
अँडरसन एक धाव काढून परतला, तर वुड ७ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने २३ धावांत ८३ धावा देत ५ गडी बाद केले. हॅझलवुडने ३ आणि नाथन लॉयनने २ फलंदाज तंबूत पाठवले.

रॉजर्स चमकला
ऑस्ट्रेलियन सलामीवीर रॉजर्सने ८१ चेंडूंत ७ चौकार खेचत नाबाद ५५ धावा काढल्या. दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर १७ धावा काढून परतला. स्मिथ नाबाद १४ धावांवर खेळत आहे. रॉजर्स-स्मिथने नाबाद ७५ धावांची भागीदारी रचली. अँडरसनने एकमेव बळी घेतला.