Home | Sports | From The Field | Ashish Nehra Has Decided To Retire From Competitive Cricket After The First T20 International Against New

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन आशिष नेहरा होणार रिटायर, 1 नोव्हेंबरला खेळेल अंतिम सामना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 11, 2017, 09:33 PM IST

टीम इंडियाचा गोलंदाज आशिष नेहरा हा व्यावसायिक क्रिकेटमधून आता रिटायर होणार आहे. न्युझीलंडविरोधात 1 नोव्हेंबरला होणारा सि

 • Ashish Nehra Has Decided To Retire From Competitive Cricket After The First T20 International Against New
  आशिष नेहराने व्यावसायिक क्रिकेटमधून रिटायर होण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर रोजी तो आपला अंतिम सामना खेळणार आहे.
  स्पोट्रर्स डेस्क- टीम इंडियाचा गोलंदाज आशिष नेहरा हा व्यावसायिक क्रिकेटमधून आता रिटायर होणार आहे. न्युझीलंडविरोधात 1 नोव्हेंबरला होणारा सिरीजमधील पहिला टी-20 सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल. याबाबत त्याने टीमचा कप्तान विराट कोहली आणि टीमचा हेड कोच रवी शास्त्री यांना सांगितले आहे.
  नुकताच परतला होता टीममध्ये
  - आशिष नेहराला ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सुरु असणाऱ्या टी-20 सिरीजमध्ये टीममध्ये सामील करण्यात आले होते. आठ महिन्यानंतर तो टीममध्ये परतला होता.
  - या मालिकेपुर्वी तो शेवटची टी-20 मॅच फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरोधात खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरोधात सिरीजच्या पहिल्या दोन मॅचमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
  घरच्या मैदानावर खेळणार शेवटचा सामना
  - 1 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर तो आपला शेवटचा व्यावसायिक टी-20 क्रिकेट सामना खेळणार आहे. तो घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळू इच्छित होता.
  - 38 वर्षीय नेहराची निवड ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात झाली आहे. पण त्याला सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
  - BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नेहराने याबाबत हेड कोच रवी शास्त्री आणि कप्तान विराट कोहली यांच्यासोबत याबाबत चर्चा केली आहे. तो दिल्लीच्या सामन्यानंतर खेळण्यास उत्सुक नाही. नेहराच्या म्हणण्यानुसार निवृत्त होण्याची ही योग्य वेळ आहे.
  - नेहराने आपल्या ज्युनिअर प्लेअर्सला संधी मिळावी, यासाठी आपण निवृत्ती स्वीकारत असल्याचे म्हटले आहे.
  1999 मध्ये केले होते पदार्पण
  - आशिष नेहराने 1999 मध्ये मोहम्मद अजहरुद्ददीनच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानविरोधातील कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
  - आपल्या करिअरमध्ये त्याने 17 कसोटी सामने, 120 एकदिवसीय सामने आणि 26 टी-20 सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 44, एकदिवसीय सामन्यात 157 आणि टी 20 सामन्यात 34 विकेट आहेत.
  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 • Ashish Nehra Has Decided To Retire From Competitive Cricket After The First T20 International Against New
  आशीष नेहराने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 17 टेस्ट, 120 वन डे आणि 26 टी 20 मॅच खेळल्या आहेत.

Trending