आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० वर्ल्डकपच्या लक्ष्याने खेळेन, वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्वचषकासाठी भारतीय टी-२० संघात स्थान मिळवायचे असेल तर आॅस्ट्रेलियातील टी-२० सामन्यांमध्ये आपल्याला पूर्ण क्षमतेने प्रदर्शन करावे लागेल, असे मत गत पाच वर्षांपासून दुर्लक्षित असलेला अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने व्यक्त केले.

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ३७ वर्षीय डावखुऱ्या गोलंदाजाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बोटाच्या दुखापतीमुळे त्याला अंतिम सामन्यात खेळता आले नव्हते. तेव्हापासून आपली पुन्हा भारतीय संघात वर्णी केव्हा लागते याची नेहरा वाट बघत होता. अखेर त्याला आॅस्ट्रेलियातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळाले.
नसल्यापेक्षा उशिरा का होईना संघात स्थान मिळाल्यामुळे मी उत्तम कामगिरी करीन. मी कठोर मेहनत घेत आहे. वर्ल्डकपचे लक्ष्य ठेवूनच मी ऑस्ट्रेलियात चांगले प्रदर्शन करेन, असे नेहराने नमूद केले.

आशिषची आंतरराष्ट्रीय कामगिरी
डावखुऱ्या द्रुतगती गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समाधानकारक कामगिरी केली आहे. १२० एकदिवसीय लढतीत नेहराने १५७ बळी घेतले असून आठ टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १३ बळींची नोंद आहे.