आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलेक्टर्सना विचारून खेळायला सुरुवात केली नाही, मग निवृत्तीसाठी परवानगी कशाला : नेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवृत्ती संदर्भातील वादावर म्हणाला, मी माझ्यासाठी फेअरवेल मॅचची मागणी केलीच नव्हती. - Divya Marathi
निवृत्ती संदर्भातील वादावर म्हणाला, मी माझ्यासाठी फेअरवेल मॅचची मागणी केलीच नव्हती.
स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंडच्या विरोधात सिरीजमधील पहिली टी 20 मॅच खेळून क्रिकेटला अलविदा म्हणणाऱ्या आशीष नेहराने चिफ सिलेक्टर एमएसके प्रसादवर हल्ला केला आहे. प्रसाद यांनी म्हटले होते की, दिल्लीच्या सामन्यात नेहरा खेळेल की नाही, याबाबत नक्की काहीही सांगता येणार नाही. त्याला उत्तर देताना नेहराने मॅचनंतर म्हटले की, मी माझ्यासाठी कोणत्याही फेयरवेल मॅचची डिमांड केली नव्हती. तसेच मी सिलेक्टर्सना विचारून खेळायला सुरुवात केली नव्हती तर निवृत्तीसाठी परवानगी का घेईल, असेही नेहरा म्हणाला. 

माझ्याशी बोलणे झाले नाही.. 
- आशीष नेहराने बुधवारी दिल्लीत झालेल्या टी20 मॅनंतर क्रिकेटला अलविदा केले. भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला.  
- नेहराला जेव्हा प्रसाद यांच्या मॅच खेळण्याच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले तेव्हा, नेहरा म्हणाला की हो मी याबाबत ऐकले आहे. 
- पुढे बोलताना नेहरा म्हणाल, मला माहिती नाही कारण ते माझ्याशी याबाबत काहीही बोलले नाही. 

विराटसमोर केला होता निवृत्तीचा उल्लेख 
नेहरा म्हणाला, गेल्या महिन्यात जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाच्या विरोधात पहिला टी20 सामना खेलायला रांचीला गेलो होतो, तेव्हा मी विराटला माझ्या प्लानबाबत सांगितले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की तू श्योर आहेस का. कारण तू अजूनही IPL खेळू शकतोस. तू कोच आणि प्लेयर म्हणूनही खेळू शकतोस असेही कोहली म्हणाला होता. त्यावेळी मी म्हणालो होतो, नाही मला पूर्णपणे निवृत्त व्हायचे आहे. 

विराट आणि शास्त्रीही मॅनेजमेंटचाच भाग 
एमएसके प्रसादवर हल्ला करताना नेहरा म्हणाला, मला वाटते विराट आणि रवी शास्त्रीदेखिल मॅनेजमेंटचाच एक भाग आहेत. त्यांच्याबरोबर मी याबाबत बोललो होतो. सिलेक्टर्सबरोबर माझी याबाबत चर्चा झाली नाही. क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मी कोणत्याही सिलेक्टर्सना विचारले नव्हते, मग आता जातानाही मला त्यांच्या परवानगीची गरज नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...