आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup 2016 : India Vs Bangladesh On 24 Feb 2016

आशिया कप: आज पहिला सामना IND vs BAN, या प्लेयर्समध्ये दिसेल टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बुधवारी भारत-बांगलादेश सामन्याने आशिया कपची सुरुवात होईल. पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅटमध्ये होत असलेल्या या टूर्नामेन्टमध्ये या दोन्हीही संघाला विजयाचे दावेदार मानले जात आहे. भारत भारताने पाचवेळा आशियाकप जिंकला आहे. तर बांगलादेश पहिला आशिया कप जिंकण्यासाठी झगडताना दिसेल.

शिखर-रोहित फॉर्मात..
विजयाच्या मार्गावरः धोनीच्या नेतृत्वाव संघ विजयाच्या मार्गावर आहे. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाला 3-0 आणि नंतर श्रीलंकेला 2-1ने पराभूत केले असून टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

बॅट्समन फॉर्ममध्येः ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर मिडल ऑर्डरला विराट-रहाणे-रैना कधीही सामन्याचा निकाल बदलवू शकतात.

ऑलराउंडर्सचा फायदाः संघात रवींद्र जडेजा, सुरेश रैना, युवराजसिंग आणि अश्विनसारखे सीनियर ऑलराउंडर्स आहेत. या शिवाय हार्दिक पांड्या आणि पवन नेगीसारखे यंगर्सदेखील आहेत
बेस्ट बॉलिंगः या फॉरमॅटमध्ये अश्विन नंबर वन बॉलर आहे. जडेजादेखील चांगल्याच फॉर्मत आहे. तर, अनुभवी नेहराच्या साथीला आहे यंग बुमराह.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, भारत आणि बांगलादेशच्या कोणत्या प्लेयर्समध्ये असेल तगडी टक्कर आणि त्यांचे टी-20 रेकॉर्ड...