आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक T-20: टीम इंडियाचा सलग चौथा विजय, यूएईवर 9 विकेटने मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - टीम इंडियाने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातला ९ विकेटने पराभूत करून विजयी चौकार मरला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांशिवाय फलंदाजांत "प्लेअर ऑफ द मॅच' रोहित शर्मा (३९) आणि युवराजसिंग (नाबाद २५) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. संयुक्त अरब अमिरातने (यूएई) ९ बाद ८१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १०.१ षटकांत १ बाद ८२ धावा काढून सहज विजय मिळवला. टीम इंडियासाठी सामन्याचा विजयी चौकार युवराजसिंगने मारला.
दुबळी टीम यूएईच्या गोलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. मात्र, टीम इंडियाविरुद्ध त्यांची गोलंदाजी प्रभावहीन दिसली. रोहित शर्माने ७ चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा ठोकल्या. रोहितच्या फलंदाजांना विजय लगेचच नजरेसमोर दिसू लागला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या युवराजसिंगने ४ चौकार आणि १ षटकार मारला. भारत आणि यूएई सामन्यात संघर्षाची आशा नव्हतीच. आशिया चषकाच्या फायनलमध्ये याआधीच प्रवेश केलेल्या भारतीय संघाने या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीचा चांगला सराव केला. भारताने बेंचवर बसलेले तीन खेळाडू भुवनेश्वरकुमार, अष्टपैलू पवन नेगी आणि ऑफस्पिनर हरभजनसिंग यांना संधी दिली.
यूएईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी केली असती तर यूएईच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई झाली असती. भारताने ९ विकेटने या सामन्यात विजय मिळवत फायनल जिंकण्याचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे. रविवारी फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी होईल.
तत्पूर्वी, भारताच्या गोलंदाजीपुढे यूएईने कसाबसा ९ बाद ८१ धावांचा स्कोअर उभा केला. यूएईच्या शैमन अन्वरने ४३ धावांची खेळी केली नसती, तर यूएईची टीम यापेक्षा अधिक संकटात सापडली असती. त्याच्या खेळीने थोडीतरी लाज राखली. शैमानने यूएईकडून सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी केली. सलामीवीर रोहन मुस्तफाने २२ चेंडूंचा सामना करताना २ चौकारांच्या साह्याने ११ धावा काढल्या. या दोघांशिवाय यूएईच्या इतर फलंदाजांना दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. इतर फलंदाजांनी केवळ खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. यूएईची सुरुवात अत्यंत संथ आणि सुमार झाली. ३.३ षटकांत यूएईने २ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. यानंतर शैमानने एका टोकाने सांभाळून खेळ केला. मात्र, दुसऱ्या टोकाने एकेक गडी बाद होत गेला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सर्व गोलंदाजांना विकेट, पाहा सामन्यातील फोटो..
अखेरच्‍या स्‍लाइडवर वाचा धावफलक..