आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup: Mahendra Singh Dhoni Suffers Injury, Parthiv Patel Called In As Cover

आशिया चषकात धोनीचा सहभाग संदिग्ध; पार्थिव पटेलचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी टीम इंडियाला जोरदार धक्का बसला. सरावादरम्यान भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे स्नायू दुखावले आहेत. यामुळे बॅकअप म्हणून यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलला संघात बोलावण्यात आले आहे. तो लवकरच ढाका येथे भारतीय संघात सहभागी होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

सोमवारी सराव सत्राच्या वेळी धोनी जखमी झाला. निवड समितीने पार्थिव पटेलला बॅकअप म्हणून निवडले आहे.a धोनीची दुखापत किती गंभीर आहे हे बीसीसीआयने सांगितले नाही. मात्र, ज्या पद्धतीने पार्थिव पटेलला आशिया चषकासाठी तातडीने तयार होण्यास सांगितले त्यावरून मार्च महिन्यात भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी बीसीसीआय धोनीबाबत कसलीही जोखीम घेण्यास तयार नाही हे स्पष्ट होते. पाकिस्तानविरुद्ध २७ फेब्रुवारीस होणाऱ्या सामन्यापर्यंत पूर्ण फिट होण्यासाठी पहिल्या सामन्यात धोनीला विश्रांतीसुद्धा दिली जाऊ शकते. भारताला टी-२० आशिया चषकात आपला पहिला सामना बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी बांगलादेशसोबत खेळायचा आहे.

गुजरातचा ३० वर्षीय विकेटकीपर फलंदाज पार्थिवने भारतासाठी २० कसोटी, ३८ वनडे, २ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने या सत्रात विजय हजारे, देवधर ट्रॉफीत शतके ठोकली. त्याने भारतासाठी अखेरीस २१ फेब्रुवारी २०१२ रोजी ब्रिस्बेन येथे श्रीलंकेविरुद्ध तिरंगी मालिकेचा सामना खेळला होता. सोमवारी बुमराहनेसुद्धा सराव केला नाही.