आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीच्या 6 बदनाम कथा, कोणी मित्राच्या WAGs तर कोणी मित्राच्या आईसोबत ठेवले संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल (डावीकडे). निकितासोबत मुरली विजय (उजवीकडे वरती), निकितासोबत दिनेश कार्तिक. - Divya Marathi
दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल (डावीकडे). निकितासोबत मुरली विजय (उजवीकडे वरती), निकितासोबत दिनेश कार्तिक.
मारिया शारोपोव्हाला डोपिंगमुळे दोन वर्षे टेनिस कोर्ट बाहेर राहाण्याची शिक्षा झाली होती. यावेळी संपूर्ण जग तिच्या विरोधात गेले होते. पण टेनिस असोसिएशनच्या या कारवाईला तिची मैत्रिण कॅरोलिन वोज्नियाकीने कडाडून विरोध करत मैत्रीचे एक अनोखे उदाहरण घालून दिले होते. तिचा दावा होता, की मारियाने जाणूनबुजून काहीही केलेले नाही. तिला झालेली शिक्षा ही चुकीची आहे.
संकटकाळी मित्रासाठी धावून जाण्याची ही घटना क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जाते. कारण काही खेळाडू असे आहेत ज्यांनी केवळ मित्रालाच धोका दिलेला नाही तर, मैत्रीच्या नात्यालाही बट्टा लावला आहे. दिनेश कार्तिक आणि मुरली विजयचेच पाहा, दिनेशची पत्नी आता मिसेस मुरली विजय आहे. दुसरीकडेप्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर जेम्स लेब्रॉयनने त्याच्या मित्राला यापेक्षाही मोठा धोका दिला आहे. लेब्रॉयनचे त्याच्या मित्राच्या आईसोबत शारीरिक संबंध होते. आम्ही तुम्हाला सांगत आहे अशाच काही घटनांबद्दल..

#1 क्रिकेटर दिनेश कार्तिक : प्रिय पत्नी आणि मित्राने दिला धोका
- तामिळनाडुचा स्टार विकेटकिपर दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांची मैत्री सर्वांनाच माहित होती. दोघांनी सोबतच फर्स्टक्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
- आयपीएलमध्येही हे दोघे बराचकाळ सोबत खेळत होते. मात्र आता परिस्थिती अशी आहे की दोघे एकमेकांचा चेहरा पाहाण्यासही तयार नाहीत.
- झाले असे, की 2007 मध्ये आयपीएल-5 दरम्यान दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रिण निकीतासोबत लग्न केले, मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.
- 2012 मध्ये आयपीएल-5 दरम्यान कार्तिक आणि निकीता सोबत होते. याच दरम्यान निकीताचे मुरली विजयसोबत सूत जुळले.
- या अफेअरची माहिती दिनेश कार्तिकला कळाल्यानंतर त्याने निकिताला सोडचिठ्ठी देण्याचे नक्की केले आणि लवकरच त्यांच्यात घटस्फोट झाला. घटस्फोट झाला तेव्हा निकिता प्रेग्नेंट होती.
- घटस्फोट झाल्याबरोबर निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले. दिनेश कार्तिकला हा फार मोठा धक्का होता. एवढा की त्याने नंतर निकिताने जन्म दिलेल्या मुलावर हक्क देखील सांगितला नाही.
- दिनेशने 2015 मध्ये स्कॉश स्टार दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा 5 कथा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...