आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aussies Give Brendon McCullum Guard Of Honour For Last ODI

अखेरच्या वनडेत मॅक्लुमची तुफानी बॅटींग, असा मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्णधार ब्रेंडन मॅक्लुम आणि त्याच्या स्वागताला उभे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू - Divya Marathi
कर्णधार ब्रेंडन मॅक्लुम आणि त्याच्या स्वागताला उभे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
हॅमिल्टन - न्यूझीलंडने आपला कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमला त्याच्या कारकीर्दीतील अखेरच्या वनडेत मालिका विजयाने निरोप दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार कामगिरी करून ५५ धावांनी विजय मिळवला. ब्रेंडन मॅक्लुमचा हा कारकीर्दीतील अखेरचा सामना होता. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४५.३ षटकांत सर्वबाद २४६ धावा काढल्या. यानंतर किवीज गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ४३.४ षटकांत १९१ धावांत गुंडाळून सनसनाटी विजय मिळवला.

अखेरच्या वनडेत धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन टीम ५ बाद १६४ अशा सुस्थितीत होती. मिशेल मार्श बाद झाल्यानंतर कांगारूंचा डाव अवघ्या १९१ धावांत आटोपला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्तिलने ५९ धावा काढल्या. मॅक्लुमने अापल्या अखेरच्या खेळीत २७ चेंडूंत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ४७ धावा ठोकल्या. ग्रांट इलियटने ५०, तर कोरी अँडरसनने २७ धावांचे योगदान दिले. इतरांनी निराशा केली. न्यूझीलंडने आपल्या अखेरच्या ६ विकेट अवघ्या २३ गमावल्या.

संक्षिप्त स्कोअर :न्यूझीलंड : २४६. ऑस्ट्रेलिया : सर्वबाद १९१.