आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया अ संघाचा १-० ने सहज मालिका विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - चारदिवसीय दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने १० गड्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह पाहुण्या संघाने दोन सामन्यांची ही मालिका १-० ने आपल्या नावे केली. विजेत्या ऑस्ट्रेलिया अ संघासाठी दुसऱ्या डावात स्टीव्ह ओ किफेने ४ विकेट, गुरविंदर संधूने ४ विकेट घेऊन जबरदस्त प्रदर्शन केले. यानंतर कर्णधार उस्मान ख्वाजाने नाबाद ४१ धावा काढल्या.

पाहुण्या संघाने सकाळी भारत अ संघाचा डाव ८८.३ षटकांत २७४ धावांत गुंडाळला. यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने दुसऱ्या डावात अवघ्या ६.१ षटकांत विजयासाठी आवश्यक असलेल्या ६१ धावा काढल्या. एकही विकेट न गमावता त्यांनी हे लक्ष्य गाठत मालिका १-० ने जिंकली. कॅमरून बेनक्रॉफ्टने नाबाद २१, तर कर्णधार उस्मान ख्वाजाने नाबाद ४१ धावा काढून पहिल्या विकेटसाठी अभेद्य ६२ धावांची भागीदारी करीत विजयश्री मिळवली. बेनक्रॉफ्टने १४ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि एक चौकार खेचत खेळी केली, तर ख्वाजाने २३ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ७ चौकार मारले.

भारताचा डाव लवकर आटोपला
सकाळी भारत अ संघाने कालच्या ६ बाद २६७ धावांवरून पुढे खेळण्यास सुुरुवात केली. त्या वेळी अपराजित २८, तर एस. गोपाल शून्यावर खेळत होते. गोपाल शून्यावरच बाद झाला. बाबा अपराजितही दोन धावांची भर घालून ३० धावा काढून बाद झाला. शनिवारी भारत अ संघाने केवळ ५.३ षटके खेळताना ७ धावांत ४ विकेट गमावल्या.
छायाचित्र: ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात गडी बाद करणाऱ्या संधूचे अभिनंदन करताना ऑस्ट्रेलियन खेळाडू.
बातम्या आणखी आहेत...