आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका : ऑस्ट्रेलियाची भारतावर मात, भारत अ संघ ११९ धावांनी पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाला तिरंगी मालिकेतील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पाहुण्या ऑस्ट्रेलिया अ संघाने शुक्रवारी यजमान टीमला धूळ चारली. ऑस्ट्रेलियाच्या युवा टीमने ११९ धावांनी विजयाची नोंद केली.

मूळ भारतीय वंशाच्या गुरविंदर सिंग (४/२८) आणि अॅडम झम्पा (४/४९) यांनी धारदार गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया अ संघाने चार गड्यांच्या माेबदल्यात ३३४ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान भारत अ संघाने २१५ धावांत गाशा गुंडाळला.उन्मुक्त चंदने ४७ चेंडूंत ५२ धावा काढल्या. त्यानंतर केदार जाधवने ५६ चेंडूंत ५० धावांची खेळी केली.
बातम्या आणखी आहेत...