आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया अ संघाचा ३ विकेटने सोपा विजय, कसोटी सामन्यात भारत अ संघावर केली मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलिया अ संघाने शानदार फलंदाजी करताना भारत अ संघावर पहिल्या औनपचारिक डे-नाइट कसोटी सामन्यात ३ विकेटने विजय मिळवला. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, कॅमरून बेनक्रॉफ्ट (५८*) आणि वेबस्टर (३०) यांनी पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करून सामना भारताच्या हातून हिसकावला. १५९ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाने ४ बाद ५९ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांकडे रोमांचक विजय मिळवण्याची संधी होती. मात्र, बेनक्रॉफ्ट आणि वेबस्टरने चांगली फलंदाजी करून सामना भारताच्या हातून ओढला. बेनक्रॉफ्टने नाबाद ५८ धावा काढून विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
भारत अ : २३० आणि १५६.
ऑस्ट्रेलिया अ : २२८ आणि ७ बाद १६१.
बातम्या आणखी आहेत...