आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Lost Ashes Series By 3 1 After Defeat In Nortingham

कांगारूंची जिरवली, इंग्लंडने चौथी कसोटी एक डाव ७८ धावांनी जिंकली; अॅशेस ३-१ ने जिंकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्टिंगहॅम - वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ तोऱ्यात होता. अॅशेस मालिकेपूर्वी कांगारूंनी शब्दिक हल्ले चढवताना इंग्लंडला डिवचले होते. मालिकेपूर्वी विजयाच्या तोऱ्यात राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची इंग्लंडने चांगलीच जिरवली. चौथ्या कसोटीत एक डाव आणि ७८ धावांनी विजय मिळवून इंग्लंडने अॅशेस मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ७ बाद २४१ धावांवरून पुढे सुरुवात केली. कालचा नाबाद फलंदाज स्टार्क शून्यावरच बाद झाला. त्याला बाद करून स्टोक्सने आपल्या सहा विकेट पूर्ण केल्या. तळाचे फलंदाज हॅझलवूड (०) आणि नॅथन लॉयन (४) यांना वूडने त्रिफळाचीत करून विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अवघ्या १२ धावांची भर घालताना तीन विकेट गमावल्या. दुसऱ्या टोकाने कालचा नाबाद फलंदाज अॅडम वोग्सने अर्धशतक साजरे केले. वोग्सने ११८ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ५१ धावा जोडल्या.

यजमान इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ३६ धावांत ६ विकेट तर एम. वूडने ६९ धावांत ३ विकेट घेतल्या. पहिल्या डावात ८ विकेट घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या डावात एक गडी बाद केला. ब्रॉडच "मॅन ऑफ द मॅच'ठरला. तिसऱ्या दिवशीच इंग्लंडने कांगारूंचा बँड वाजवला.

इंग्लंडमध्ये फ्लॉप
क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड दौऱ्यात पूर्णपणे अपयशी ठरला. चौथ्या सामन्यात तर ऑस्ट्रेलियाला अवघ्या ६० धावा काढता आल्या. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी खेळाडूंनी क्लार्कवर सडाडून टीका केली.

२३ विजय, १६ पराभव
मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २३ कसोटी सामने जिंकले, तर १६ मध्ये त्यांचा पराभव झाला. ७ सामने ड्रॉ झाले. भारताविरुद्ध शतक ठोकून कसोटी कारकीर्दीला सुरुवात.

अॅशेस मालिका (इंग्लंड ३-१)
> पहिली कसाेटी, कार्डिफ, इंग्लंड १६९ धावांनी विजयी
> दुसरी कसोटी, लंडन, कांगारू ४०५ धावांनी विजयी
> तिसरी कसोटी, बर्मिंघम, इंग्लंड ८ विकेटने विजयी
> चौथी कसोटी, नाॅर्टिंगहॅम, इंग्लंड डावाने विजयी
> पाचवी कसोटी, ओव्हल, २० ऑगस्टपासून होणार.
पुढील स्लाइडवर वाचा, क्लार्कची निवृत्तीची घोषणा...