आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Australia V West Indies: Sodden Sydney Loses In Tale Of Two Cricket Cities

तिसरी कसोटी: सलामीवीर क्रेग ब्रेथवेटचे झुंजार अर्धशतक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सलामीवीर क्रेग ब्रेथवेटच्या (८५) शानदार अर्धशतकी खेळीनंतरसुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पाहुण्या वेस्ट इंडीजचा डाव ६ बाद २०७ धावा असा गडगडला. पहिल्या दिवशी विंडीजने संघर्ष करून दोनशेचा टप्पा गाठला. तिसऱ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदीन २३ आणि कार्लाेस ब्रेथवेट ३५ धावांवर खेळत होते.

सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसानेसुद्धा घोळ घातला. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ ७५ षटकांचा खेळ होऊ शकला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शाई होप अवघ्या ९ धावा काढून चालता झाला. यानंतर ब्रेथवेट आणि डॅरेन ब्राव्हो (३३) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटताच विंडीजचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाने पाहुण्या संघाच्या विकेट ठरावीक अंतराने घेतल्या. वेस्ट इंडीजची टीम ६ बाद १५९ अशी संकटात सापडली होती. यानंतर दिनेश रामदीन आणि कार्लोस ब्रेथवेट यांना ४८ धावांची अभेद्य भागीदारी करून वेस्ट इंडीजला दोनशेचा टप्पा गाठून दिला. ६ बाद १५९ या स्कोअरवर विंडीजचा डाव २०० च्या आत संपण्याची भीती होती. ७८ चेंडूंत ५० धावा : क्रेग ब्रेथवेटने आपल्या ५० धावा ७८ चेंडूंत ४ चौकारांच्या साह्याने पूर्ण केल्या. तो ८५ धावा काढून बाद झाला.

धावफलक
वेस्ट इंडीज दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
के. ब्रेथवेट झे. स्मिथ गो. लॉयन ८५ १७४ १० ०
होप झे. नेव्हिल गो. हेझलवूड ०९ १७ ० ०
ब्राव्हो झे. ख्वाजा गो. पॅटिंसन ३३ ९५ ६ ०
सॅम्युअल्स धावबाद ०४ २० १ ०
जे. ब्लॅकवूड त्रि. गो. लॉयन १० २९ २ ०
दिनेश रामदीन नाबाद २३ ७२ २ ०
होल्डर झे. बर्न्स गो. किफे ०१ ०९ ० ०
सी. ब्रेथवेट नाबाद ३५ ३५ ४ २

अवांतर : ७. एकूण : ७५ षटकांत ६ बाद २०७ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१३, २-१०४, ३-११५, ४-१३१, ५-१५८, ६-१५९. गोलंदाजी : हेझलवूड १२-२-३५-१, पॅटिंसन १३-२-४१-१, लॉयन ३२-११-६८-२, मिशेल मार्श ४-१-१५-०, किफे १४-४-४२-१.
बातम्या आणखी आहेत...