आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कसोटी : अॅडम वोग्स, मार्शची शतके; विक्रमी त्रिशतकी भागीदारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होबार्ट - मधल्या फळीचे फलंदाज अॅडम वोग्स आणि शॉन मार्श यांच्या अभेद्य त्रिशतकी भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद ४३८ धावांचा डोंगर उभा केला. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी अॅडम वोग्स १७४ आणि शॉन मार्श १३९ धावांवर खेळत होते.

अॉस्ट्रेलियाने सकाळी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जे. बर्न्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ११ षटकांत ७५ धावांची आक्रमक सलामी दिली. बर्न्स ३३ धावा काढून बाद झाला. त्याला गाब्रियलने त्रिफळाचीत केले. बर्न्सने ४३ चेंडूंत ७ चौकारांसह ही खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार स्टिव्हन स्मिथ मोठी खेळी करू शकला नाही. तो अवघ्या १० धावा काढून बाद झाला. स्मिथला वॉरिकनने ब्लॅकवूडकरवी झेलबाद केले. स्मिथ १०४ धावांच्या स्कोअरवर बाद झाला. दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करून अर्धशतक ठोकले. वॉर्नरने ६१ चेंडूंत ११ चौकारांसह ६४ धावा ठोकल्या. तो बाद झाला तेव्हा आॅस्ट्रेलियन टीम ३ बाद १२१ धावा अशी संकटात सापडली होती. नंतर वोग्स आणि शॉन मार्श यांनी डाव सावरला. वेस्ट इंडीजकडून वॉरिकनने १११ धावांत २ िवकेट, तर गाब्रियलने एक विकेट घेतली.
यंदा सत्राच्या सुरुवातीला वाेग्सने अापल्या अांतरराष्ट्रीय कसाेटी करिअरला सुरुवात केली. त्याने विंडीजविरुद्ध पहिला सामना खेळला हाेता. अाता वाेग्सने १०० चेंडूंचा सामना करताना १०० धावांची शानदार खेळी केली. वोग्स व मार्श यांनी फक्त डाव सावरला नाही, विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई करून धावगती वाढवली. ऑस्ट्रेलियाने वनडे स्टाइल फलंदाजी करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
बातम्या आणखी आहेत...