आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी अखेर ड्रॉ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी ड्रॉ झाली. अॉस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव्हन स्मिथ (१३८) आणि अॅडम वोग्ज (११९) यांच्या शतकानंतर आपला दुसरा डाव ७ बाद ३८५ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला विजयासाठी ३२१ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत २८ षटकांत २ बाद १०४ धावा काढल्या. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० ने पुढे आहे. न्यूझीलंडला ४८ षटकांत ३२१ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, पावसामुळे ९० मिनिटांचा वेळ पाण्यात गेला. विल्यम्सनने ३२ आणि रॉस टेलरने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले.

१६७२ धावा बरसल्या
सामन्यात दोन्ही संघांनी जबरदस्त फलंदाजी केली. सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून तब्बल १६७२ धावा िनघाल्या. यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (२५३),न्यूझीलंडचा रॉस टेलर (२९०) यांच्या द्विशतकासह एकूण सहा शतके सामील आहेत.