बंगळुरू - गत सामन्यातील पराभवातून सावरलेला अाॅस्ट्रेलिया संघ अायसीसीच्या टी-२० विश्वचषकात विजयी ट्रॅकवर परतला अाहे. या टीमने साेमवारी विजयाचे खाते उघडले. अाॅस्ट्रेलियाने स्पर्धेतील अापल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर ३ गड्यांनी मात केली. दुसऱ्या गटात अाॅस्ट्रेलियाचा हा पहिला विजय ठरला. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने अाॅस्ट्रेलियाचा पराभव केला हाेता.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश टीमने ५ बाद १५६ धावा काढल्या हाेत्या.प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने १८.३ षटकांत सात गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. अाॅस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा (५८) अाणि शेन वाॅटसनने (२१) अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली.
तत्पूर्वी, बांगलादेश टीमकडून सकीब (३३) अाणि अाॅलराउंडर महमुद्दुलाह (नाबाद ४९) यांनी शानदार खेळी केली महमुद्दुलाहने २९ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४९ धावा काढल्या. तसेच सलामीवीर मिथुनने २२ चेंडूंमध्ये एक चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे २३ धावांची खेळी केली. यष्टिरक्षक मुशफिकूर रहिमने नाबाद १५ धावांचे याेगदान दिले. यात दाेन चाैकारांचा समावेश अाहे. मुशफिकूर व महमुद्दुलाह यांनी शानदार फलंदाजी करताना सहाव्या गड्यासाठी अभेद्य ५१ धावांची भागीदार केली. त्यामुळे टीमला सन्मानजनक धावसंख्या उभी करता अाली.
अाॅस्ट्रेलियाच अॅडम झंपा चमकला. त्याने प्रथमच करिअरमध्ये विकेटची नाेंद केली. त्याने अापल्या करिअरमधील चाैथ्या सामन्यात हे यश संपादन केले. त्याने बांगलादेशविरुद्ध तीन बळी घेतले. तसेच शेन वाॅटसनने दाेन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ५ बाद १५६ धावा, अाॅस्ट्रेलिया : ७ बाद १५७ धावा
पुढील स्लाइड्सवर वाचा, टी ट्वेन्टी वर्ल्डकपसंदर्भातील काही बातम्या..