आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामना - अाॅस्ट्रेलियाच्या चार दिग्गजांची अर्धशतके; युवा टीमवर विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- दिग्गज स्टाेइनिस (७६), डेेव्हिड वाॅर्नर (६४), कर्णधार स्टीव्हन स्मिथ (५५) अाणि ट्रेव्हिस हेड (६५) यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर पाहुण्या अाॅस्ट्रेलिया एकादशने सराव सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. अाॅस्ट्रेलियाने मंगळवारी वनडे मालिकेच्या तयारीसाठी झालेल्या सामन्यात यजमान बाेर्ड अध्यक्षीय एकादशचा पराभव केला. अाॅॅस्ट्रेलियाने १०३ धावांनी सामना जिंकला. भारताच्या युवा टीमने विजयासाठी शर्थीची झंुज दिली. मात्र, टीमचा प्रयत्न अपुरा ठरला. यासह अागामी वनडे मालिकेसाठी अापण सज्ज असल्याचे पाहुण्या अाॅस्ट्रेलियाने दाखवून दिले.   

चार दिग्गजांच्या झंझावाती अर्धशतकांच्या बळावर अाॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना यजमान बाेर्ड अध्यक्षीय एकादश टीमसमाेर विजयासाठी खडतर ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. अॅस्टाेन अगरच्या (४/४४) धारदार गाेलंदाजीमुळे  प्रत्युत्तरात यजमानांच्या युवा टीमने ४८.२ षटकांत  २४४ धावांत गाशा गुंडाळला. युवा टीमकडूनन गाेस्वामी (४३) व मयंक अग्रवालने (४२) एकाकी झुंज दिली.       

कर्णधार गुरकिरत सिंगच्या नेतृत्वाखाली बाेर्ड अध्यक्षीय एकादशने सामन्यात अापले काैशल्य पणास लावले. धावांचा पाठलाग करणाऱ्या यजमान युवा टीमची निराशाजनक सुरुवात झाली. राहुल त्रिपाठी (७) स्वस्तात बाद झाला.    

गाेेस्वामी-मयंंकची अर्धशतकी भागीदारी व्यर्थ : यजमानांच्या युवा टीमच्या सलामीवीर गाेस्वामी व मयंक अग्रवालने दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली. मयंकने ४७ चेंडूंत ४ चाैकारांसह ४२ धावा काढल्या.  गाेस्वामीने ४३ धावांची खेळी करून तंबू गाठला.
 
रविवारपासून वनडे मालिका 
 
रविवारपासून  भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुुरुवात हाेईल. चेन्नईच्या मैदानावर मालिकेतील सलामीचा वनडे सामना रंगणार अाहे. श्रीलंका दाैऱ्यातील उल्लेखनीय यशानंतर टीम इंडिया सध्या फाॅर्मात अाहे.
 
हेड, स्टाेइनिसची अर्धशतके
स्टाेइनिस व ट्रेव्हिस हेडने झंझावाती खेळी करताना वैयक्तिक अर्धशतके ठाेकली. हेडने ६३ चेंडूंत ६५ धावा  काढल्या. यात ५ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. स्टाेइनिसने ६० चेंडूंचा सामना करताना चार चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे ७६ धावांची खेळी केली.   
 
स्मिथ-डेव्हिड वाॅर्नरची शतकी भागीदारी 
अाॅस्ट्रेलियन एकादशच्या सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर (६४) अाणि कर्णधार स्मिथने (५५) झंझावाती फलंदाजी केली. यासह त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. दरम्यान, सलामीवीर कार्टराइट हा भाेपळा न फाेडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर स्मिथने संघाचा डाव सावरला. त्याने ६८ चेंडूंत चार चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे ५५ धावांची खेळी केली. तसेच वाॅर्नरने ४८ चेंडूंत ६४ धावा काढल्या. यात ११ चाैकारांचा समावेश अाहे.   
बातम्या आणखी आहेत...