ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा विकेटकीपर ब्रॅड हॅडिन याने रिटायरमेंट जाहिर केली. तो अॅशेज सीरीजदरम्यान प्लेइंग इलेवनमध्ये निवड न झाल्याने नाराज होता. परिणामी अॅशेज सीरीज, अरध्यावर सोडूनच तो इंगलंडहून ऑस्ट्रेलियाला निघून गेला. आता त्याने क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली आहे. त्याने बोलावलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान हॅडिनबरोबर त्याची मुले आणि पत्नी करीनाही होते. तो त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या पत्नीला देतो.
क्लोज फ्रेंडने करून दिली होती ओळख
ब्रॅड हॅडिन आणि करीनाची पहिली ओळख त्यांच्या एका क्लोज मित्राने 2001 मध्ये करून दिली. यानंतर हॅडिन आणि करीना नियमित संपर्कात होते. शेवटी एक वेळ आली आणि या जोडीने लग्नाचा निर्णय घेतला. तब्बल 6 वर्षे चालेल्या या अफेअरचे 2007 मध्ये लग्नात रुपांतर झाले. यांना मिया नावाची एक मुलगी, तर जॅक आणि ह्यूगो नावाची दोन मुले आहेत.
करीना हॅडिनच्या फिटनेसवर 'फिदा'
ऑस्ट्रेलियाच्या सर्वात ग्लॅमरस वॅग्स पैकी एक करीना हॅडिनच्या फिटनेसची चाहती आहे. ती म्हणते की, हॅडिन 37 वर्षांचा असूनही फिट आहे. अनेकदा तर मलाही वाटते की, मीही फिटनेस ट्रेनिंग घ्यावी आणि फिट रहावे, मात्र वेळ मिळत नाही. हॅडिनला विकेटच्या मागे हवेत उडी मारून झेल टीपताना पहाणे माझासाठी सर्वात चांगला क्षण असतो. करीनाची उंची 5 फूट 7 इंच एवढी आहे. ती अॅथलेटिक बॉडीची मालकिन आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रॅड हॅडिन आणि करीनाचे खास फोटो...