आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Cricketer Mitchell Johnson Forget To Call Mother In Marriage

लग्नात आईला बोलविण्यास विसरला, हनिमुननंतर जॉन्सनने टाकला होता घरी अणुबॉम्ब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी जेसिकासोबत मिचेल जॉन्सन. वरच्या इन्सेटमध्ये मिशेलची आई विक्की. दुसऱ्या इन्सेटमध्ये जेसिकाचा ग्लॅमरस फोटो. - Divya Marathi
पत्नी जेसिकासोबत मिचेल जॉन्सन. वरच्या इन्सेटमध्ये मिशेलची आई विक्की. दुसऱ्या इन्सेटमध्ये जेसिकाचा ग्लॅमरस फोटो.
मुलगा आणि त्याची पत्नी हनिमुन आटोपून घरी आले आणि आईला जबर धक्का बसला असे होऊ शकते का... नाही ना... पण ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मिचेल जॉन्सनच्या बाबतीत हे घडले आहे. तो आणि त्याची पत्नी हनिमुननंतर घरी आले तेव्हा त्याची आई विक्की हार्बरला जबर धक्का बसला. त्याचे झाले असे, की लग्नाला आईला बोलविण्यास मिचेल विसरुन गेला. एवढेच नव्हे तर फेसबुक पोस्टवरुन विक्की यांना मिशेलच्या लग्नाची माहिती मिळाली होती. यावेळी त्यांना जोरदार धक्का बसला होता.
सुनबाई आवडली, पण हे अचानक कसे झाले
मिचेल जॉन्सन आणि कराटे चॅम्पिअन जेसिका यांनी 2011 मध्ये गुपचुप लग्न केले. त्यांच्या लग्नात जवळचे केवळ 50 लोक सहभागी झाले होते. त्यात जॉन्सनच्या आईचा समावेश नव्हता. त्यांना लग्नाची जराही माहिती नव्हती. मालदिवला हनिमुन साजरे केल्यावर कपल मायदेशी परतले. तेव्हा त्यांनी फेसबुकवर लग्नाचा फोटो टाकला. तो त्यांच्या आईने बघितला. तेव्हा त्या म्हणाल्या, की मला माहिती होती, की दोघे 2009 पासून डेट करीत आहेत. जेसिका मला आवडली होती. पण मला लग्नाची माहिती नव्हती. त्याला मला काहीच सांगितले नाही. मला फेसबुकवर समजले होते. मला खरंच खुप धक्का बसला आहे.
चुडैल आहे ती, माझा मुलगा चोरला
काही महिन्यांपूर्वी विक्की यांनी एक मुलाखतीत सांगितले, की माझी सुन चुडैल आहे. तिने माझा मुलगा चोरला. लग्न झाल्यानंतर माझा मुलगा कधीही घरी राहायला आला नाही. तिने माझ्यापासून त्याला दूर नेले आहे.
9 वर्षांचा असतानाच आईवडीलांचा घटस्फोट
जॉन्सन 9 वर्षांचा असताना आई विक्की आणि वडील केविन यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर विक्की यांनी जॉन्सनचे पालनपोषण केले. जॉन्सनच्या लग्नाबाबत केविन यांचे मत जरा वेगळे होते. लग्नावर ते म्हणाले होते, की कपल टुरवर आहे. मला आवडले. त्यांनी एन्जॉय करावे.
पुढील स्लाईडवर बघा, मिचेल जॉन्सनचे निवडक फोटो....