अॅशेज मालिकेत झालेल्या पराभवाचा परिणाम ऑस्ट्रेलियन संघात आजूनही दिसून येत आहे. क्लार्क आणि हॅडिन यांच्या पोठोपाठ आता स्टार खेळाडू शेन वॉटसनने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. अशी चर्चा आहे की, टेस्ट टीममध्ये प्लेइंग इलेवनमधून आत-बाहेर होत असल्या कारणाने त्याने हा निर्णय घेतला आहे. आता तो ऑस्ट्रेलियासाठी वनडे आणि टी20 क्रिकेटमध्येच खेळताना दिसेल.
पत्नीमुळे राहिला चर्चेत
ऑस्ट्रेलियाबरोबरच जगातील टॉप स्फोटक खेळाडूंपैकी एक शेन वॉटसन 2002 पासून ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळला. 34 वर्षांचा शेन वॉटसन खेळा शिवाय पत्नी ली फरलॉन्गमुळेही चर्चेत राहिला. ली सर्वात पहिले तेव्हा चर्चेत आली जेव्हा, 2010 मध्ये तिने इंग्लंडच्या क्रिकेटर्सवर पत्नी बरोबर ठेवण्यास लावण्यात अलेल्या बॅनची खिल्ली उडवली होती. वॉटसन-ली यांचा विवाह जून 2010 मध्ये झाला. नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना पत्नीसह राहण्याची परवांगी मिळाली नव्हती. यावर बोलताना लीने म्हटले होते की, पत्नीला सोबत ठेवणे ही एक नॉर्मल गोष्ट आहे.
स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहे ली
वॉटसनची ग्लॅमरस पत्नी ली ही एक व्यवसाईक स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहे. लीने फॉक्स स्पोर्ट्ससाठी अनेक टीव्ही शोज केले आहेत. शेन आणि ली यांची ओळख एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये त्यांच्या मित्राने करून दिली. हे दोघेही 2006 मध्ये एक-मेकांना डेट करायचे. लग्न होण्या आधी एका सर्व्हेच्या निश्कर्षानुसार ली ही जगातील नंबर वन क्रिकेटर WAG राहिली आहे. या कपलने जून 2010 मध्ये विवाह केला. यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे.
स्विमरला करत होती डेट
2006 मध्ये वाटसनची भेट होण्या आधी लीचे एका स्पोर्ट्स स्टारशी प्रेम प्रकरण सुरू होते. ती त्याला डेटही करायची. हा स्पोर्ट प्लेअर होता ऑस्ट्रेलियाचा टॉप स्विमर इयान थॉर्पे. स्टायलिश आणि टीव्ही प्रेझेंटेशन करत असल्याने ती स्पोर्ट्सच्या जगतातही चर्चेत होती.
सर्वात श्रीमंत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
फोर्ब्सच्या नुसार, भारतच्या बाहेर शेन वॉटसन हा सर्वाधिक पैसे कमावणारा क्रिकेटर राहिला आहे. 2012 ते 2014 पर्यंत त्याची एकूण संपत्ती 5.9 मिलियन डॉलर्स एवढी होती. 2011 मध्ये शेन वॉटसन सर्वाधिक पैसे कमावणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ठरला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पत्नी आणि मुलांसह शेन वाटसनचे काही पर्सनल फोटो...