आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open: Sania Mirza, Martina Hingis Won The Third Grand Slam Continuously

सानिया-हिंगीसने जिंकले सलग तिसरे ग्रँडस्लॅम, असा केला जल्लोश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीसने यंदाच्या पहिल्याच ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विजेतेपद पटकावले आहे.
या जोडीचा हा सलग तिसरा ग्रँडस्लॅम आहे. सानिया-हिंगीसने झेक गणराज्याची आंद्रिया लाव्हाकोव्हा- ल्युसी रादेका या सातव्या मानांकित जोडीला १ तास ९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत ७-६, ६-३ ने पराभवाची धूळ चारली. २०१५ मध्ये विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनमध्ये किताब जिंकल्यानंतर सानिया-हिंगीसने यंदाचा पहिलाच ग्रँडस्लॅमही आपल्या ताब्यात घेतला. या विजयासोबतच या दोघींनी सलग ३६ लढतींत विजयाची नोंद केली आहे.
पुरुष गटाच्या उपांत्य लढतीत ब्रिटनचा खेळाडू अँडी मरेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कसा मिळाला विजय...
- काय म्हणाल्या सानिया-हिंगीस... आणि पाहा त्यांच्या जल्लोशाचे PHOTOS...