आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Australian Top Order Batsman Shaun Marsh Is Celebrating His 33rd Birthday

बड्या घराण्यातील या क्रिकेटरने केले रिपोर्टरशी लग्न, पाहा दोघांची लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी रिबेकासह शॉन मार्श (डावीकडे) - Divya Marathi
पत्नी रिबेकासह शॉन मार्श (डावीकडे)
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज शॉन मार्शने नुकतेच ( 9 जुलै) आपला 33 वाढदिवस साजरा केला. ऑस्ट्रेलियन संघात कधी सलामीला तर कधी मधल्या फळीत खेळणा-या या गुणी फलंदाजाने आपल्या देशासाठी 3206 धावा केल्या आहेत. ज्यात 6 शतकांचा समावेश आहे. तो आपल्या फॅमिलीतील तिसरा क्रिकेटर ठरला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित खास माहिती सांगणार आहोत. खूप खास फॅमिलीशी संबंधित आहे शॉन...
- शॉन मार्शची फॅमिली म्हणजे क्रिकेटरची फॅमिली म्हटले जाते. त्यांच्या घरातून तीन क्रिकेटर ऑस्ट्रेलियाकडून खेळले आहेत.
- शॉनचे वडील जोफ मार्श 80 च्या दशकात ऑस्ट्रेलियन संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.
- वडीलांसोबत त्याचा छोटा भाऊ मिशेल मार्श सुद्धा क्रिकेटर आहे. मिशेल ऑस्ट्रेलियाचा एक चांगला कसोटी खेळाडू आहे.
- शॉनची छोटी बहिण मेलिसा ऑस्ट्रेलियाच्या महिला बास्केटबॉल लीगमध्ये खेळली आहे.
- बर्थडे बॉय शॉनचे निकनेम SOS आहे.
जगातील तीन फॅमिलीपैकी आहे एक-
- मार्श फॅमिली जगातील अशा तीन क्रिकेटर फॅमिलीपैकी एक आहे ज्यात वडील आणि दोन्ही मुले आपल्या देशासाठी टेस्ट क्रिकेट खेळले आहेत.
- इतर दोन फॅमिली म्हणजे हेडली फॅमिली (वाल्टर, डेल आणि रिचर्ड हेडली) आणि अमरनाथ फॅमिली (लाला, सुरिंदर आणि मोहिंदर अमरनाथ)
- शॉन मार्श IPL मध्ये किंग्ज एलेव्हन पंजाब (KXIP)खेळतो.
रिपोर्टरवर बसले प्रेम-
- शॉनच्या बायकोचे नाव रिबेका आहे. जी ऑस्ट्रेलियातील चॅनेल-7 ची रिपोर्टर आहे.
- रिबेका इतकी सुंदर आहे की, ती ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये सामील झाली होती.
- दोघांची पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा रिबेका एका मुलाखतीच्या निमित्ताने शॉन मार्शला भेटली होती.
- यानंतर या दोघांत जवळिक वाढत गेली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- नोव्हेंबर, 2013 मध्ये शॉनने एक डिनर डेटवर रिबेकाला प्रपोज केले. ज्याचा खुलासा खुद्द रिबेकाने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केला होता.
- या दोघांचे लग्न 2 एप्रिल 2015 रोजी झाले. आता त्यांना एक मुलगा झाला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शॉन मार्शच्या खासगी आयुष्यातील काही निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...