आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारीत भारत दौ-यावर: पुण्यात पहिल्यांदाच होणार TEST MATCH

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेब्रुवारी -मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियात भारतात कसोटी मालिका खेळेल. - Divya Marathi
फेब्रुवारी -मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियात भारतात कसोटी मालिका खेळेल.
नवी दिल्ली- पुढील वर्षी भारतात होणा-या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शुक्रवारी BCCI आणि CA (क्रिकेट ऑस्ट्रेलिया) ने 4 कसोटी मालिकेची घोषणा केली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी नावाची ही सीरीज फेब्रुवारी-मार्च, 2017 मध्ये होईल. पहिली कसोटी 23 फेब्रुवारीपासून पुण्यात खेळली जाईल. इतर 3 कसोट्या बंगलुरु, रांची आणि धर्मशाला येथे खेळल्या जातील. पुणे, रांची आणि धर्मशाला येथे पहिल्यांदाच कसोटी सामने खेळवले जात आहेत. असे आहे वेळापत्रक....
पहिली टेस्टः 23 ते 27 फेब्रुवारी, पुणे
दूसरी टेस्टः 4 ते 8 मार्च, बंगलुरु
तिसरी टेस्टः16 ते 20 मार्च, रांची
चौथी टेस्टः 25 ते 29 मार्च, धर्मशाला
पुढील महिन्यात इंग्लंड संघ येईल भारतात-
- न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे सीरीजनंतर इंग्लंड संघ भारतात दाखल होईल.
- इंग्लंड नोव्हेंबरमध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका खेळेल. मालिकेतील पहिली कसोटी 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान राजकोट येथे होईल.
- दूसरी कसोटी (17 ते 21 नोव्हेंबर) विशाखापट्टनम, तिसरी कसोटी (26 ते 30 नोव्हेंबर) मोहाली, चौथी (8 ते 12 डिसेंबर) मुंबईत आणि पाचवा कसोटी (16 ते 20 डिसेंबर) चेन्नईत खेळली जाईल.
- या मालिकेनंतर इंग्लंड टीम ख्रिसमस आणि न्यू ईयर हॉलिडेसाठी परत आपल्या देशात जाईल.
- जानेवारीत पुन्हा इंग्लंड संघ भारतात येईल व जानेवारीत 3 वन डे सामने आणि तीन टी- 20 मॅचेसची सीरीज खेळेल.
बातम्या आणखी आहेत...