आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजच्या एव्हिन लेविसची विक्रमाला गवसणी, T-20 सामन्यात नाबाद 125 धावांची विक्रमी खेळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग्सटन, जमैका - यजमान वेस्ट इंडीजला एकमेव टी-२० सामन्यात भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवून देण्यासाठी एव्हिन लेविसने (नाबाद १२५)  झंझावाती शतक ठाेकले.  याच शतकाच्या बळावर त्याने थेट विश्वविक्रमाला गवसणी घातली. याशिवाय त्याने मालिका पराभवातून सावरलेल्या विंडीजचा दाैऱ्याचा शेवटही गाेड करून दिला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सध्या त्याच्यावर काैतुकाचा माेठा वर्षाव केला जात अाहे. 
 
याशिवाय या धडाकेबाज खेळीमुळे लेविसला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. या शतकामुळे विंडीजने रविवारी मध्यरात्री भारतावर ९ गड्यांनी माेठ्या विजयाची नाेंद केली.  
 
भारतविरुद्ध सलग शतकांचा विक्रम : विंडीजच्या एव्हिन लेविसने टीम इंडियाविरुद्ध रविवारी दुसरे शतक ठाेकले. यापूर्वी त्याने गतवर्षी २०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या टी-२० सामन्यातही भारताविरुद्ध झंझावाती शतकी खेळी केली हाेती. याच उल्लेखनीय खेळीमुळे त्याला अापल्या नावे नवा विक्रम करता अाला. एकाच टीमविरुद्ध दाेन टी-२० सामन्यात शतक ठाेकणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला अाहे.  
 
ह्यातला टाकले मागे 
अांतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात लक्ष्यचा पाठलाग करताना एव्हिन लेविसने वैयक्तिक सर्वाधिक माेठा स्काेअर उभा केला. त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना सहा चाैकार अाणि १२ षटकारांच्या अाधारे नाबाद १२५ धावा काढल्या. यामध्ये त्याने हाँगकाँगच्या बाबर ह्यातला मागे टाकले. बाबरने २०१६ अाशिया चषकात अाेमानविरुद्ध सामन्यात १२२ धावांची खेळी केली हाेती.
 
मॅक्लुम, क्रिस गेलशी केली बराेबरी 
विंडीजच्या लेविसने ६२ चेंडूंत नाबाद १२५ धावा काढल्या. यासह त्याने याच छाेट्या फारमेंटमध्ये दाेन शतके ठाेकून अापल्याच देशाच्या स्फाेटक फलंदाज क्रिस गेल अाणि न्यूझीलंडच्या मॅक्लुमच्या कामगिरीशी बराेबरी साधली. अांतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दाेन शतके ठाेकणारा लेविस हा तिसरा फलंदाज ठरला.  
 
बातम्या आणखी आहेत...