आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर कधीही पराभूत न होण्याच्या जिद्दीने मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी आयपीएलमध्ये दोन हॅट्ट्रिक झाल्या. मात्र, सामन्यांच्या निकालाने स्पष्ट झाले की नशीब केव्हाही पालटू शकते. दोन्ही सामन्यांत हॅट्ट्रिक होणे, ही प्रभावी कामगिरी ठरली. यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक हॅट्ट्रिक करणारी टीम (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) पराभूत झाली.   

क्रिकेट हा वेगळाच खेळ आहे, हेच सत्य आहे. या सत्रात आपला पहिला सामना खेळणारा वेस्ट इंडीजच्या सॅम्युअल बद्रीसोबत जे घडले, त्याची कल्पना त्यानेही केली नसेल. आपली फसवणूक झाली आहे, अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली नसेल तर नवल. बद्रीने सुरुवातीच्या स्पेलमध्ये मुंबईच्या चार खेळाडूंना बाद केले तेव्हा आरसीबीच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. मात्र, त्याच्याच देशाचा केरोन पोलार्डने बंगळुरूच्या आशेवर पाणी फेरले. याविरुद्ध अँड्रयू टायचे आयपीएल पर्दापण त्याच्यासाठी दुहेरी आनंद देणारे ठरले. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हॅट्ट्रिक केली. शिवाय गुजरातला या सत्रात पहिला विजय मिळवून दिला. त्याने पुण्याविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. पुण्याची टीम २०० च्या स्कोअरकडे जात असताना टाय आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी आला. त्यानंतर जे घडले, ते सर्वांना माहितीच आहे.   

बद्री आणि टायच्या गोलंदाजीवर प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र, दोन्ही सामन्यांचे निकाल उलट लागले. मुंबई आणि पुणे संघाची मानसिकता हे मोठे कारण आहे. कधीही पराभूत न होण्याच्या जिद्दीमुळे मुंबईने आरसीबीवर विजय मिळवला. मुंबईने सत्रात चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. यातील दोनमध्ये त्यांनी अखेरच्या षटकात विजय मिळवला. त्यांच्या संघात विजयासाठी किती कटिबद्धता आहे, हे यातून दिसून येते. दुसरीकडे पुण्याने आपल्या सामन्यात मुंबईला हरवले. यानंतर पुणे संघाने उर्वरित सामन्यांत आत्मसमर्पण केल्याचे दिसले. विराेधी संघाच्या दुबळ्या बाजूचासुद्धा पुण्याने फायदा उचलला नाही. 

यावरुन खेळाडूंत आत्मविश्वास आणि क्षमतेची उणीव असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मुंबईच्या खेळाडूंची महत्त्वाकांक्षा आणि खेळाडूंतील बाँडिंग प्रदर्शनात दिसून येते. मुंबईचा नितीश राणा आणि पंड्या बंधूंनी (हार्दिक आणि कृणाल) यांनी संघात स्टार खेळाडूंची गर्दी असताना आपली जबाबदारी समजून खेळ केला आणि संघाला विजय मिळवून दिला. पोलार्ड आधीच्या तीन सामन्यांत अपयशी ठरला. मात्र, चौथ्या सामन्यात ७० धावा काढून त्याने विजय मिळवून दिला. संघाला त्याच्यावर आणि पोलार्डला स्वत:वर विश्वास होता, म्हणून हे शक्य झाले. दुसरीकडे पुण्याला अजून आपले कच्चे दुवे शोधण्याची गरज आहे. पुण्याकडे चांगल्या खेळाडूंची कमी नाही. मात्र, हे खेळाडू प्रतिभेनुसार प्रदर्शन करण्यात अपयशी ठरले आहे. रहाणे आणि धोनीनेसुद्धा निराश केले आहे. 

ज्या संघांनी (हैदराबाद, पुणे, पंजाब, कोलकाता) शानदार सुरुवात केली होती, ते आता अडचणीत आहेत. तर ज्या संघांनी (मुंबई, दिल्ली, गुजरात) सुरुवातीला अडचणींचा सामना केला, त्यांचे प्रदर्शन आता सुधारले आहे. संघात स्टार खेळाडूंची उपस्थिती असली तरीही संघ संतुलन साधणे किती कठीण आहे, हे यावरून दिसून येते. हे सर्व पुढच्या वर्षीच्या बोली प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
 
- ayazmamon80@gmail.com
बातम्या आणखी आहेत...