आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटचे सर्व ज्ञान म्हणते टीम इंडिया जिंकेल, मात्र पाकची गोलंदाजी खतरनाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझा एक स्टॅटिशयन मित्र आकडे गोळा करण्यात व्यग्र आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल होणार अाहे म्हणून तो व्यग्र आहे. सर्व आकड्यांनुसार भारत विजयी होईल, असा दावा करत आहेत. सोबतच योगायोगही म्हणत आहेत. भारत-पाक साखळी सामना रविवारी झाला होता. आता फायनलसुद्धा रविवारी आहे, असे ते म्हणत आहेत. उर्वरित तुम्ही समजून घ्या. पुन्हा टी-२० विश्वचषक २००७ चा उल्लेख करतात. तेव्हा सुद्धा साखळीत पाकला हरवून आपण फायनल खेळलो होतो. नंतर पुन्हा फायनलमध्ये पाकिस्तानला हरवले होते, असाही योगायोग असल्याचे बोलले जात आहे.
 
माझा अंदाज यापेक्षा थोडा आधीपासून आहे. १९८५ पासून. तेव्हा भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा स्पर्धेत समोरासमोर होते. भारताने आधी पाकला साखळीत हरवले होते. नंतर फायनलसुद्धा त्यांच्याविरुद्ध जिंकले. ती आयसीसीची स्पर्धा नव्हती. मात्र, रविवार नक्की होता. हे सुद्धा लक्षात ठेवावे लागेल की वनडे आणि टी-२० हे भिन्न प्रकारचे खेळ आहेत. यामुळे मी १९८५ च्या विजयाला अधिक महत्त्व देतो. या सर्वांत पाकिस्तानच्या शानदार खिलाडूवृत्तीला आपण विसरता कामा नये. १९८६ च्या शारजामध्ये ऑस्ट्रेलेशिया कपच्या फायनलमध्ये अखेरच्या चेंडूवर जावेद मियाँदादने भारताला हरवले होते. मियाँदादने षटकार मारून विजय मिळवला.  
 
मात्र, आपण या योगायोगाला हटवून फक्त योग्यतेचा विचार केला पाहिजे. कॉमनसेन्स आणि क्रिकेटचा अभ्यास भारत विजयाचा दावेदार असल्याचे म्हणते. श्रीलंकेविरुद्धचा सामना सोडला तर आपण सर्व सामन्यांत प्रभावी खेळ केला आहे. टीम सध्या अजेय दिसत आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि कोहली जबरदस्त फॉर्मात आहेत. वेगवान गोलंदाज, फिरकीपटूही लयीत आहेत. कर्णधार कोहलीची आक्रमकता आणि विजयाच्या भुकेने संघात किलिंग स्टिंक्ट निर्माण केले आहे.  
 
सर्व आकडे, योगायोग आणि आताचा फॉर्म सुद्धा भारताच्या विजयाची गॅरंटी देत नाहीत. पाकने पहिला सामना गमावल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे पुनरागमन केले आहे, ते पाहता भारताने सावध राहिले पाहिजे. भारताने पाकच्या वेगवान गोलंदाजांपासून साधव राहायला हवे. मो. आमेर आणि जुनैद खानच्या स्किलमुळे हे दोघे सर्वांत खतरनाक पेस अटॅक आहे. मात्र, पाकची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बेभरवशाचे आहे. ती कधीही कोसळू शकते. संघ म्हणून टीम इंडिया अत्यंत संतुलित आहे. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे आपण सर्वांना माहिती आहे. धक्कादायक निकाल हे याचे वैशिष्ट्य आहे. अशात विजयाची शक्यता असताना कोहली ब्रिगेडने सावध राहिले पाहिजे. तुम्ही चेंडूवरून कधीही नजर हटवता कामा नये, ही क्रिकेटची म्हण लक्षात ठेवणे योग्य ठरेल. एकूणच विराट कोहलीची टीम इंडिया विजयासाठी फेव्हरेट आहे. मात्र, पाकला कमी लेखूण जमणार नाही.

ayazmamon80@gmail.com
 
हेही वाचा,