आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेल्सना यष्टीशी धाग्याने जोडण्याची तयारी; आता विकेटकीपर जखमी होण्याच्या घडणार नाहीत घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- यष्टीवर ठेवलेल्या बेल्स उडून विकेटकीपरचे डोळे जखमी होण्याचे प्रकार आता घडणार नाहीत. नियमांचे संरक्षक मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) यष्टीच्या मागे प्रत्येक क्षणी चेंडूवर लक्ष ठेवणाऱ्या विकेटकीपरच्या सुरक्षेची काळजी घेताना नियमात बदल केला आहे. एमसीसी क्लबने बेल्सला धाग्याने स्टम्पला जोडण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे गोलंदाजाच्या चेंडूमुळे बेल उडाल्या किंवा स्टम्प मोडले तरीही विकेटकीपर जखमी होण्याचे प्रकार घडणार नाहीत. संभाव्य अपघातापासून वाचण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.  

नियमात बदल असा झाला
एमसीसीने नियम ८.३ मध्ये बदल  केला आहे. बेल्स स्टम्पला धाग्याने जोडण्यासाठी द. आफ्रिका आणि इंग्लंडमधील दोन कंपन्यांशी क्लबने संपर्क  साधला आहे. एमसीसीचे विधी अधिकारी फ्रेसर स्टीवर्ट यांच्या मते आयसीसीकडून लवकरच याला मान्यता मिळेल. 

दोन घटना सर्वांना माहीत... 
१. बाऊचर झाला जखमी :
२०१२ मध्ये द.आफ्रिकेचा दिग्गज विकेटकीपर मार्क बाऊचर डोळ्याला बेल लागल्याने जखमी झाला होता. बाऊचरची दुखापत अत्यंत गंभीर होती.  त्याने त्या क्षणीच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
२. डाउंटनवर लागला ब्रेक : दोन दशकांआधी इंग्लंडचा विकेटकीपर पॉल डाउंटनचे करिअरसुद्धा बेल्स लागल्यामुळे संपुष्टात आले होते. तोसुद्धा बेल तोंडाला लागल्याने जखमी झाला होता.

एमसीसी क्रिकेटची नियामक संस्था
आयसीसी क्रिकेटचे संचालन करणारी आणि एमसीसी क्रिकेट नियम बनवणारी संस्था आहे. एमसीसीकडे नियम बदलण्याचे अधिकारसुद्धा आहेत. ही संस्था आयसीसीअंतर्गतच येते. एमसीसीचे नियम आयसीसीच्या शिफारशीनंतर लागू होतात.
बातम्या आणखी आहेत...