आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ball Was Touched To Thie Pad Not To Gloves, Says Belly

चेंडू ग्लोव्हजला नव्हे, थाय पॅडला लागला होता, वादावर बेलीचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत जॉर्ज बेली पहिल्याच चेंडूवर बाद होता-होता वाचला. सामन्यात डीआरएस असते तर माझ्याविरुद्ध होणारे अपील रोमांचक ठरले असते. चेेंडू ग्लोव्हज नव्हे तर थाय पॅडला लागला होता, असे बेलीने म्हटले. त्या वेळी पंचांनी बेलीला नाबाद ठरवले. या जीवदानाचा फायदा उचलत बेलीने नंतर शतक ठोकले.

बेलीविरुद्ध अपील झाले त्या वेळी ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावल्या होत्या. पंचांनी बेलीला बाद न दिल्याने सामना भारताच्या हातून निसटला. वाकच्या सपाट खेळपट्टीवर रोहित शर्माने नाबाद १७१ धावा ठोकल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्हन स्मिथने १४९ आणि जॉर्ज बेलीने ११२ धावा काढून विजयात सिंहाचे योगदान दिले. बेली पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता. त्या वेळी बरिंदर सरणचा चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागून यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हाती पोहोचला. मात्र, पंचांनी त्याला नाबाद दिले.

स्कोअर आव्हानात्मक : हा चेंडू माझ्या थाय गार्डला लागला होता, असे मला वाटते. यावर डीआरएस झाले असते तर सामना रोमांचक झाला असता. ३१० धावांचा पाठलाग करताना आम्ही चिंतेत नव्हतो. आमच्याकडे चांगले हिटर होते. रनरेट ८ किंवा ९ वर जरी गेला असता तरीही आम्ही चिंतेत पडलो नसतो. आमचे लक्ष पुढच्या चेंडूवर होते. आम्ही लय मिळवली होती. आम्ही नैसर्गिक खेळ करत होतो, असेही बेलीने म्हटले.