Home »Sports »From The Field» Bangladesh Beat Sri Lanka On 100 Th Test

बांगलादेशची 100 व्या कसाेटीत श्रीलंकेवर मात

वृत्तसंस्था | | Mar 20, 2017, 03:40 AM IST

  • बांगलादेशची 100 व्या कसाेटीत श्रीलंकेवर मात
काेलंबाे -बांगलादेशने अापल्या १०० व्या कसाेटीत शानदार विजय संपादन करून इतिहास रचला. पाहुण्या बांगलादेशने रविवारी दुसऱ्या कसाेटीत यजमान श्रीलंकेवर ४ गड्यांनी मात केली. सलामीवीर तमीम इक्बालच्या (८२) शानदार अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने कसाेटी जिंकली. या विजयाच्या बळावर बांगलादेशने दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. त्यामुळे यजमान श्रीलंका संघाचे घरच्या मैदानावर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले.
बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार तमीम इक्बाल सामनावीर अाणि शाकिब-अल-हसन हा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. शाकिबने मालिकेत १६९ धावा अाणि एकूण ९ विकेट घेण्याची शानदार कामगिरी केली. बांगलादेशचा काेणत्याही कसाेटीतला श्रीलंकेविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. हे यश बांगलादेशला १०० व्या कसाेटीत मिळाले.
बांगलादेश चाैथा संघ : अापल्या १०० व्या कसाेटीत विजय संपादन करणारा बांगलादेश हा संघ ठरला. बांगलादेशने १०० व्या कसाेटीत श्रीलंकेला पराभूत केले. यापूर्वी अापल्या १०० व्या कसाेटीत अाॅस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज अाणि पाकिस्तान टीमने विजय संपादन केले अाहेत.
१०० कसाेटीत नववा विजय
बांगलादेशने अातापर्यंतच्या १०० कसाेटीत केवळ ९ विजय संपादन करता अाले. यातील ७६ कसाेटीत बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच १५ कसाेटी अनिर्णीत राहिल्या.
तमीमचे अर्धशतक
बांगलादेशच्या तमीमने एकाकी झुंज देताना १२५ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार व एका षटकारासह ८२ धावांची खेळी केली. त्याने शब्बीरसाेबत तिसऱ्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : पहिला डाव : ३३८ धावा, दुसरा डाव : ३१९ धावा, बांगलादेश : पहिला डाव : ४६७ धावा, दुसरा डाव : ६ बाद १९१ धावा (५७.५ षटक)

Next Article

Recommended