आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh Captain Says That, We Didn’T Have Dinner After Defeat To India

भारताकडून झालेल्या अपमानास्पद पराभवानंतर बांगलादेशी संघ उपाशीच झोपला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांग्लादेश संघाचा कर्णधार मशरफे मुर्तजा 6 धावा करून बोल्ड झाला होता. - Divya Marathi
बांग्लादेश संघाचा कर्णधार मशरफे मुर्तजा 6 धावा करून बोल्ड झाला होता.
नवी दिल्ली- टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभवचा धक्का बसल्यानंतर बांगलादेशचे सर्वच्या सर्व खेळाडू उपाशी झोपले होते. त्या त्यादिवशी कुणीही काहीही खाल्ले नाही. असा खुलासा खुद्द बांगलादेश संघाचा कर्णधार मशरफे मुर्तजा याने केला आहे. सध्या मुर्तजा कश्मीरमध्ये हॉलिडे टूरवर आला असून, एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने हे तेथील लोकांसोबत शेअर केली.

रोमहर्षक सामन्यात 1 धावेने झाला होता पराभव
- मुर्तजा म्हणाला जय पराजय हा खेळाचा एक भागच आहे. मात्र आम्ही जिंकण्यासाठीच खेळत होतो. हरण्याची आमची मुळीच इच्छा नव्हती.
- केवळ 1 धावेने झालेल्या पराभवामुळे आम्ही सर्वजन निराश झालो होतो. त्या रात्री कुणीही डिनर घेतले नाही.
- या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशचे तीन बळी गेले होते. त्यांना विजयासाठी 11 धावा करता आल्या नाही.
- काश्मीरमध्ये हॉलीडेवर आलेल्या मुर्तजाने हा वृत्तांत काही मुलांनी शेवट्या ओव्हर संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देतांना सांगितला.
- श्रीनगर-सोनमर्ग रोडवर मुर्तजा मुलांना क्रिकेट खेळताना पाहून काहीवेळ थांबला होता.
- येथे त्यांने मुलांना बॅटिंगच्या काही टिप्स दिल्या आणि बॉलिंगही केली.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, सामन्यातील शेवटच्या ओव्हरमधील रोमांच....