आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकपमध्ये भारत दुसऱ्यांदा उपविजेता, फायनलमध्ये वेस्ट इंडीजने ५ विकेटने हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - बांगलादेशातील १९ वर्षांखालील खेळाडूंच्या वर्ल्डकपमध्ये भारताने उपविजेतेपद पटकावले. युवांच्या फायनलमध्ये वेस्ट इंडीजने भारतावर ५ विकेटने विजेतेपद जिंकले. वेस्ट इंडीजने शानदार गोलंदाजी करून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला केवळ १४५ धावांवर रोखले. यानंतर ५ विकेटच्या मोबदल्यात १४६ धावा काढून विजयश्री मिळवली. वेस्ट इंडीजचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. भारताने पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारताने तीन वेळा किताब आणि २ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे.

प्रत्युत्तरात विंडीजकडून कॅर्टीने अर्धशतक ठोकताना ५२ धावा काढल्या. याशिवाय पॉलने नाबाद ४० धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. कॅर्टीने १२५ चेंडूत २ चौकारांसह नाबाद ५२ धावा काढल्या. त्याने ६८ चेंडूत नाबाद ४० धावा काढल्या. कर्णधार हेटमेरने २३, तर इम्लाचने १५ धावा काढल्या. भारताकडून गोलंदाजीत डागरने २५ धावांत ३ विकेट तर आवेश खान अणि अहेमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, सरफराज खानने ५१ धावा काढल्यामुळे भारताला शंभरी ओलांडता आली. सरफराजशिवाय लोमररने १९ व बाथमने २१ धावा काढल्या. ऋषभ पंत (१), ईशान किशन (४), अनमोलप्रीत सिंग (३), वॉशिंग्टन सुंदर (७), अरमान जाफर (५) यांनी निराशा केली. या दिग्गजांचे अपयश भारताला भोवले.

संक्षिप्त धावफलक : > भारत : १४५.
>वेस्ट इंडीज : ५/१४६.