आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश सुस्थितीत ! बांगलादेश ४ बाद १७९; तमीम, महमुदुल्लाहची अर्धशतके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघासाठी ८९ धावांच्या भागीदारीदरम्यान धाव घेताना तमीम आणि महमुदुल्लाह. - Divya Marathi
संघासाठी ८९ धावांच्या भागीदारीदरम्यान धाव घेताना तमीम आणि महमुदुल्लाह.
चितगाव - सलामीवीर तमीम इक्बाल (५७) आणि अष्टपैलू खेळाडू महमुदुल्लाह (६७) यांच्या अर्धशतकाच्या बळावर यजमान बांगलादेशने द. अाफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ४ बाद १७९ धावा काढल्या. दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अवघ्या ६७ षटकांचा खेळ होऊ शकला.

सकाळी बांगलादेशने बिनबाद ७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर इमारूल कायेस २६ धावा काढून बाद झाला. मोमीनूल हक अवघ्या ६ धावा काढून तंबूत परतला. त्याला हॅमरने त्रिफळाचीत केले. यानंतर तमीम आणि महमुदुल्लाह यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची उपयुक्त भागीदारी केली. तमीमने १२९ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या साहाय्याने ५७ धावा जोडल्या. अर्धशतकानंतर महमुदुल्लाहही बाद झाला. त्याने १३८ चेंडूंत १० चौकारांसह ६७ धावांचे योगदान दिले.