आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता भारतापुढे अखेरचा सामना जिंकून अब्रू वाचवण्याचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका पराभवाचा सामना करणार्‍या टीम इंडियाला बुधवारी यजमान संघासोबत मालिकेतील तिसर्‍या आणि अखेरच्या वनडेत दोन हात करायचे आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका यजमान बांगलादेशने आधीच २-० ने जिंकली आहे. आता मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारताला ३-० ने क्लिनस्वीप देण्याचे प्रयत्न यजमानांचे असतील. दुसरीकडे अखेरचा सामना जिंकून अब्रू वाचवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल.
पहिल्या दोन वनडेत बांगलादेशने दमदार खेळ करून भारताला खेळाच्या सर्व क्षेत्रांत मागे टाकत विजय मिळवला. बांगलादेशने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींत भारतापेक्षा उजवी कामगिरी केली. दुसरीकडे भारतीय संघ सर्व आघाड्यांवर अपयशी ठरला. भारतीय संघाला पराभवासह बोचर्‍या टीकेचाही सामना करावा लागत आहे. कर्णधार धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने टीम इंडिया अधिकच संकटात सापडली आहे.

विजयासाठी हे महत्त्वाचे
- प्रथम फलंदाजी केल्यास सर्व फलंदाजांना मिळून ३०० प्लसचा स्कोअर करावा लागेल.
- बांगलादेशला कमी धावसंख्येत गुंडाळावे लागेल.
- भारतीय गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना धावा कमी मोजाव्या लागतील.

दोन्ही संघ असे :
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, भुवनेश्वर, धवल.

बांगलादेश : मुर्तुजा (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्य सरकार, मुशाफिकूर रहिम, सकिब-अल-हसन, शब्बीर रहेमान, नासिर हुसेन, रुबेल हुसेन, तस्किन, मुशाफिजूर रहेमान, रोनी तालुकादार, मोमिनूल हक.
बातम्या आणखी आहेत...