आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh\'s Cricketer Shakib Al Hasan Banned For Abusing Umpire During BPL

ही आहे क्रिकेटर शाकिबची ग्लॅमरस पत्नी, पार्टीमध्ये अशी करते मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपल्या मित्रांसह पार्टीत मस्ती करताना शाकिबची पत्नी उम्मी (डावीकडून). - Divya Marathi
अपल्या मित्रांसह पार्टीत मस्ती करताना शाकिबची पत्नी उम्मी (डावीकडून).
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर बांगलादेश प्रिमियर लीग (बीपीएल) टी-20 टूर्नामेंटमध्ये सामन्या दरम्यान अंपायरला उद्धटपणे बोलल्यामुळे एका सामन्यासाठी बंदी घातली आहे. गुरुवारी झालेल्या बीपीएलच्या एका सामन्यादरम्यान सिल्हट सुपर स्टारचा फलंदाज दिलशान मुनावीराला बाद केल्यानंतर हा प्रकार घडला. यात शुक्रवारी शाकिबला दोषी ठरवण्यात आले. त्याच्यावर एका सामन्याच्या बंदी बरोबरच 250 डॉलरचा दंडही ठोठावला आहे.
या प्रसंगी आम्ही आपल्याला शाकिबच्या ग्लॅमरस पत्नीची माहिती देणार आहोत.
पार्टीची आहे दर्दी...
बांगलादेश संघाचे जेव्हा जेव्हा नाव घेतले जाते, तेव्हा तेव्हा सर्वात पहिले नाव येते ते यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेला अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि त्याच्या ग्लॅमरस पत्नीचे. शाकिब अल हसनची पत्नी उम्मी विषयी फार कमी लोकांना माहिती आहे की, ती बांगलादेशी-अमेरिकन आहे. उम्मी 10 वर्षांची असतानाच तिचे कुटुंब अमेरिकेला शिफ्ट झाले. उम्मी परदेशात बाढल्यामुळे प्रचंड बिंधास्त आणि खुल्या विचारांची आहे. ती पार्टीजचीदेखील प्रचंज दर्दी आहे. शाकिब अल हसन आणि उम्मीचे लग्न 12 डिसेंबर 2012 रोजी झाले आहे. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला असतानाच शाकिबची ओळख उम्मीबरोबर झाली. त्यावेळी उम्मी अमेरिकेच्या मिनेसोटा येथे शिकत होती. 5 भाऊ आणि एक बहिन यांच्यामध्ये उम्मी सर्वात लहान आहे.
पुढील स्लाइड्सवर पाह, पार्टी एन्जॉय करताना उम्मीचे काही खास PHOTOS....