आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मिनी आयपीएल रंगणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सप्टेंबर महिन्यातील रिकाम्या वेळेत भारतीय आणि जगातील अन्य क्रिकेटपटूंना विश्रांती न देता मिनी आयपीएलचे आयोजन करून कार्यरत ठेवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयच्या कार्यकारिणीने आज धर्मशाला येथील बैठकीत मंजूर केला. दुबई किंवा अमेरिकेत दोन आठवडे चालणाऱ्या या लीगकडे ‘चॅम्पियन लीग’चा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. संयुक्त अमिरातीमधील अबुधाबी, दुबई किंवा शारजा या शहरातही सामन्यांचे आयोजन होऊ शकेल. अमेरिकेत भारतीयांची संख्या अधिक असलेल्या न्यूजर्सी, कॅलिफोर्निया किंवा अन्य शहरांचा प्रस्ताव पुढे येऊ शकेल. मात्र, बीसीसीआय मिनी आयपीएल आयोजनाचा गांभीर्याने विचार करत आहे. बीसीसीआय कार्यकारिणीने अनिल कुंबळेच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली. रणजी करंडक सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्याच्या तांत्रिक समितीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. १९ वर्षांखालील क्रिकेटपटूला आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत एकदाच प्रतिनिधित्व करता येईल. १९ वर्षांखालील क्रिकेटच्या दोनच हंगामांत प्रत्येक खेळाडूला खेळता येईल. अन्य तरुण खेळाडूंनाही संधी मिळावी यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

बीसीसीआयचा कसाेटीसाठी स्वतंत्र निधी
- कसोटीच्या लाेकप्रियतेसाठी बीसीसीआयने हंगामापासून कसोटी क्रिकेटला मोठी प्रसिद्धी व बाजारपेठ मिळावी यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध केला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या प्रचार-प्रसारासाठी बीसीसीआय व यजमान राज्य क्रिकेट संघटना यांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

- आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करणाऱ्या राज्य असोसिएशनकडून बीसीसीआय यापुढे लेखी करार करणार आहे. त्यामध्ये त्या असोसिएशनची भूमिका, जबाबदारी आणि सुविधा-सोयींचा किमान दर्जा याबाबतच्या कलमांचा उल्लेख असेल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या जागी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होईल.

- बीसीसीआयच्या वतीने अाता प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना यापुढे वार्षिक हंगामी पासेस देण्यात येतील. बेस्ट वेबसाइट, बेस्ट फेसबुक पेज, बेस्ट ट्विटर हँडल, बेस्ट इन्स्टाग्राम, बेस्ट मीडिया फॅसिलिटी, बेस्ट मीडिया ऑपरेशन्स असे पुरस्कार यापुढे राज्य असोसिएशन्सना त्यांची कार्यक्षमता पाहून दिले जातील.
बातम्या आणखी आहेत...