आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत अमेरिकेत खेळणार WI विरूद्ध दोन टी-20 सामने, 27 व 28 ऑगस्टला लढती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील फोर्ट लौडेरडेल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 लढती होतील. हेच ते स्टेडियम ज्याला आयसीसीची मान्यता आहे. - Divya Marathi
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील फोर्ट लौडेरडेल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 लढती होतील. हेच ते स्टेडियम ज्याला आयसीसीची मान्यता आहे.
मुंबई- भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौ-यावर आहे. तेथे भारतीय संघ वेसट इंडिजविरूद्ध चार कसोटी व 5 एकदिवसीय असे पूर्वनियोजित सामने खेळणार आहे. मात्र, यात आता आणखी दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेची भर भडली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अमेरिकेत आता दोन ट्वेंटी 20 लढती होतील.
येत्या 27 ऑगस्ट रोजी पहिली लढत आणि लगेच दुस-या दिवशी 28 ऑगस्टला दुसरी लढत फोर्ट लौडेरडेल येथे होतील. सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क या मैदानात आयसीसीची मान्यता आहे. त्यामुळे या दोन लढती तेथे खेळविण्यास आयसीसीने मान्यता दिली आहे. क्रिकेटचा प्रसार उत्तर व दक्षिण अमेरिकेत व्हावा या उद्देशाने या लढती घेण्याचे नियोजन केले गेल्याचे सांगण्यात आले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...