आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Asks Maharashtra To Choose Between Water Or Revenue

पाणी की 100 कोटी ? BCCI म्हणाले- यापैकी एक निवडावे लागले महाराष्ट्र सरकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल स्पर्धेचे आयोजन स्थळ इतरत्र हलवण्यात आल्यास त्यामुळे राज्याचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा दावा बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे. हा पैसा नंतर दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी वापरता येऊ शकेल, असा सल्लाही ठाकूर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेसाठी पाण्याचा अपव्यय योग्य नाही, असे म्हटले होते. गरज भासल्यास आयपीएलला पुणेे, मुंबई आणि नागपूरच्या बाहेरील राज्यात हलवले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले होते. स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित फ्रँचायझी आणि मंडळही त्यावर विचार करत आहे. उच्च न्यायालयातही एक याचिका आहे. आयपीएलच्या एका सत्रात खेळपट्टीसाठी ६० लाख लिटर पाण्याचा अपव्यय होणार आहे. कोर्टात पुढील सुनावणी १२ एप्रिलला होणार आहे. तेव्हाच चित्र स्पष्ट होईल.

बुधवारी काय म्‍हटले होते न्‍यायालयाने
> महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना क्रिकेटच्या नावाखाली मैदानांसाठी सुरू असलेल्या पाण्याच्या नासाडीवरून हायकोर्टाने बीसीसीआय, महाराष्ट्र मुंबई क्रिकेट संघटनेला बुधवारी फटकारले होते.
> 'तुमच्या दृष्टीने क्रिकेट सामने जास्त महत्त्वाचे आहेत काय, तुमचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, तेव्हाच लक्षात येईल,' अशा शब्दांत फटकारले होते.
> जेथे पाणी भरपूर आहे तेथे महाराष्ट्राबाहेर आयपीएल सामने खेळवा, असे कोर्टाने सुनावले.
पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणाले होते आयपीएल कमिशनर