आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयचे अध्यक्ष कालवश, जगमोहन दालमियांचं निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे कोलकाता येथे रविवारी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. दालमिया यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना कोलकाताच्या बीएम बिर्ला हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते.
रुग्नालयात दाखल केल्या नंतर दालमिया यांच्यावर तातडीने अँजियोप्लास्टीही करण्यात आली होती. दालमिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विश्वचषकात झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे दालमिया यांना त्यांच्या पदापासून दूर व्हावे लागले होते. मात्र श्रीनिवासन यांच्या पदच्चूतीनंतर त्यांना पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्याची संधी मिळाली. ही संधी त्यांना तब्बल दहा वर्षांनंतर मीळाली होती.