आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडविरूद्धची मालिका रद्द करू शकते BCCI, लोढा म्हणाले- रूटीन खर्च करू शकते बोर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जस्टिस आरएम लोढा यांच्या कमिटीने बॅंकांना बीसीसीआयची खाती सिल करण्याचे आदेश दिल्यानंतर न्यूझीलंडविरूद्धची सुरु असलेली मालिका रद्द होऊ शकते. - Divya Marathi
जस्टिस आरएम लोढा यांच्या कमिटीने बॅंकांना बीसीसीआयची खाती सिल करण्याचे आदेश दिल्यानंतर न्यूझीलंडविरूद्धची सुरु असलेली मालिका रद्द होऊ शकते.
नवी दिल्ली/ मुंबई- जस्टिस आरएम लोढा यांच्या कमिटीने बॅंकांना बीसीसीआयची खाती सिल करण्याचे आदेश दिल्यानंतर न्यूझीलंडविरूद्धची सुरु असलेली मालिका रद्द होऊ शकते. सोमवारी कमिटीने त्या बॅंकांना हे आदेश दिले आहेत ज्यात बीसीसीआयची खाती आहेत. या आदेशात म्हटले आहे की, पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व पेमेंट रोखली जावीत. या पेमेंटचे निर्णय बीसीसीआयने 30 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेतले होते. दरम्यान, जस्टिस लोढा समितीने म्हटले आहे की, रूटीन खर्च बीसीसीआय करू शकते. न्यूझीलंडच्या मालिकेवर परिणाम होणार...?
- भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेतील आता दोन सामने झाले आहेत. अजून एक कसोटी बाकी आहे तर पाच वन डे सामने होणार आहेत.
- मिडिया रिपोर्टनुसार, लोढा कमिटीच्या या आदेशाने बीसीसीआय खूपच नाराज आहे.
- बीसीसीआयच्या एका पदाधिका-याने सांगितले की, भारतीय क्रिकेट बोर्डाला न्यूझीलंडविरूद्धची मालिका रद्द करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कारण आमचे हात बांधले गेले आहेत.
- बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकांवरही या घटनेचा मोठा परिणाम होऊ शकेल.
लोढा समितीने बँकाना काय दिले आदेश?-
- लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशी डावलून निर्णय घेण्याचे धाडस बीसीसीआयच्या अंगाशी आले आहे.
- लोढा समितीने दोन बँकांना, बीसीसीआयने राज्य क्रिकेट संघटनांना मंजूर केलेला निधी रोखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
- राजस्थान क्रिकेट असोसिएशनला स्टेडियमच्या डागडुजीसाठी 10 कोटींचा निधी देण्यात आला होता.
- चॅम्पियन्स लीग रद्द करण्यात आल्यामुळे प्रसारण हक्क असणाऱ्या कंपनीकडून मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम सर्व सदस्यांमध्ये वाटण्याच्या आदेशालाही हरकत घेण्यात आली आहे.
- 30 सप्टेंबरला तातडीच्या कार्यकारिणी बैठकीत बीसीसीआयने हे दोन निर्णय घेतले होते.
लोढा समितीच्या सर्व शिफारशी लागू करणे केवळ अशक्य-
- लोढा समितीच्या सर्वच शिफारशी लागू करणे अशक्य आहे, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
-18 जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोढा समितीच्या शिफारशी आहेत तशा स्वीकारून त्यानंतरच नवे निर्णय घ्यावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
- हे दोन्ही निर्णय नैमित्तिक कामकाजामध्ये समाविष्ट होत नसून लोढा समितीने बँक ऑफ महाराष्ट्र येस बँक यांना सदर निधी असोसिएशन्सच्या खात्यात जमा करू नये, असा आदेश दिला आहे.
- या आदेशाची प्रत बीसीसीआय सचिव अजय शिर्के, अनिरुद्ध चौधरी प्रमुख कार्यकारिणी अधिकारी राहुल जोहरी यांना पाठवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...