आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्के, ठाकूर यांनी स्थापन केलेली कार्यालये अखेर बंद, बीसीसीअायचे मीडिया मॅनेजर निशांत अरोराचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने पदच्युत केलेले बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांनी आपल्या बीसीसीआयच्या कार्यालयीन सेवेकरिता नियुक्त केलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तेथील कार्यालय बंद करण्याच्या प्रशासकीय मंडळातल्या निर्णयामुळे सेवामुक्त व्हावे लागले आहे. प्रशासकीय मंडळापैकी एक असलेल्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी यांनी स्पष्ट केले की, आम्ही कुणाही व्यक्तीला पदावरून दूर करा, असे सांगितले नाही. अध्यक्ष व सचिवांच्या सोईकरिता सुरू करण्यात आलेली कार्यालयीन सेवा बंद करावी, असे कळविण्यात आले आहे.   

बीसीसीआयच्या प्रथेनुसार आतापर्यंत प्रत्येक पदाधिकारी आपल्या व बीसीसीआयच्या कामकाजाच्या सोईनुसार आपापल्या वास्तव्याच्या ठिकाणी कार्यालय थाटत असे. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनीही तसे केले होते.   मात्र बीसीसीआयचे मुख्यालय मुंबईत असल्यामुळे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सर्व कारभार मुंबईच्या मुख्यालयातून व्हावा, असा निर्णय गतसाली घेतला होता.त्यानुसार प्रशासक मंडळानेही अध्यक्ष व सचिवांच्या कार्यालयीन सहायकाचीच गरज नसल्याने ती कार्यालये बंद करण्याचे सांगितले.
निशांत अरोरा हे गेली १८ महिने बीसीसीआयचे ‘मीडिया मॅनेजर’ म्हणून काम करीत होते. या आधीच्या मीडिया मॅनेजरने कधीही भारतीय संघासोबत दौरा केला नव्हता. मात्र निशांत अरोरा यांनी भारतीय संघासोबत जवळजवळ सर्वच दौरे केले होते. अरोरा ड्रेसिंग रुमच्या बातम्या शिर्के, ठाकूर यांना पोहोचवत होते, असाही आरोप आहे.
 
अरोराबाबत अशीही चर्चा...
अनुराग ठाकूर यांचे निकटवर्ती व दिल्ली कार्यालयाशी संबंधित असलेले ‘मीडिया मॅनेजर’ निशांत अरोरा यांनी रविवारी रात्रीच आपला राजीनामा दिला आहे. त्यांना मुंबईच्या बीसीसीआयच्या मुख्यालयात  कामकाज करण्यासंबंधी सांगण्यात आले होते. दिल्ली सोडून इतरत्र जाऊ शकत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे कारण सांगितले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...