आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय आता नव्या प्रायाेजकाच्या शाेधात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी नव्या प्रायाेजकत्वाचा शाेध घेत आहे. यासाठी जाेरदार हालचाली सुरू झाल्या. बीसीसीआयने २०१५-१६ पासून २०१८-१९ पर्यंतच्या सर्व सामन्यांच्या प्रायाेजकत्वासाठी आता निविदा मागवल्या आहेत. याशिवाय प्रायाेजकासाठी टायटलच्या लाेगाेचाही प्रस्ताव आहे, अशी माहिती सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. बीसीसीआयच्या या निविदेला ३० जुलैपर्यंतची मुदत आहे.

आगामी २०१५ ते २०१९ दरम्यान टीम इंडिया एकूण ६० पेक्षा अधिक सामने खेळणार आहे. यातील प्रत्येक सामन्याची बाेली ही दाेन काेटींपर्यंत लागण्याचा अंदाज आहे. याच हिशेबाने एकूण १२० ते १८० काेटी रुपयांचे बजेट असेल. यामध्ये रणजी ट्राॅफी, इराणी चषक, दिलीप ट्राॅफी, देवधर करंडक, विजय हजारे ट्राॅफी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचाही या वेळी समावेश करण्यात आलेला आहे.

मायक्राेमॅक्स इन्फर्मेटिक्सने आॅक्टाेबर २०१४ ते एप्रिल २०१५ पर्यंतच्या प्रत्येक सामन्यासाठी दाेन काेटी दिले आहेत.

यापूर्वी देशातील सर्वाेच्च टेलिकाॅम कंपनी एअरटेलने २०१० ते २०१३ दरम्यानच्या ५० सामन्यांसाठी तीन काेटी ३३ लाख दिले हाेते. त्यानंतर स्टार इंडियाने एप्रिल २०१४ पर्यंतच्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रक्षेपणाचा हक्क प्रत्येकी दाेन काेटी सामन्याप्रमाणे मिळवला हाेता. त्यामुळे आता नव्या प्रायाेजकाला आगामी सामन्यासाठी नव्या दरानुसारच करार करावा लागेल.

टी-२० सामने बंगळुरूमध्ये
येत्या २५ जूनपासून न्यूझीलंड महिला क्रिकेट टीम भारत दाैर्‍यावर येत आहे. भारत-न्यूझीलंड टीममध्ये वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका हाेणार आहे. हे सर्व सामने आता बंगळुरूच्या मैदानावर हाेणार आहेत. यापूर्वी ३ टी-२० सामन्यांचे आयाेजन अल्लूर येथे करण्यात आले हाेते. मात्र, आता हे तिन्ही सामने बंगळुरू येथे स्थलांतरित झाल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली. येत्या २६ जूनपासून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ हाेईल. तसेच ११ जुलैपासून टी-२० सामने होतील.
बातम्या आणखी आहेत...