आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Selection Committee Selected Indian Team For South Africa Tour

IND v SA: टीम इंडियाची घोषणा, गुरुकीरत आणि एस अरविंद नवे चेहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठीच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये गुरुकीरत आणि एस. अरविंद नवीन चेहरे आहेत. BCCI सिलेक्शन कमेटीच्या आज झालेल्या बैठकीला कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपस्थित होता. आज झालेल्या बैठकीत टी-20 सीरीजव्यतिरिक्त एकदिवसीय सीरीजच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी टीमची निवड करण्यात आली. दोन एकदिवसीय आणि टेस्ट सीरीज यासाठी ऑक्टोबर महिन्यात सिलेक्शन केले जाणार आहे. कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनी कायम राहणार आहे.
साऊथ आफ्रिकेचा 72 दिवसांचा टूर
साऊथ आफ्रिकेचा संघ 72 दिवसांच्या टूरवर सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. येथे तो संघ तीन टी-20, पाच वनडे आणि चार टेस्ट खेळणार आहे.
अशी असेल टीम इंडिया
वनडे टीम : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, अक्षर पटेल, गुरकीरत मान, भुवेनश्वर कुमार आणि उमेश यादव.
टी-20 टीम : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, अक्षर पटेल, गुरकीरत मान, एस. अरविंद आणि हरभजनसिंग.
भारत VS साउथ आफ्रिका शेड्यूल

टी 20 सीरीज
पहिला सामना : 2 ऑक्टोबर, धर्मशाला
दूसरा सामना : 5 ऑक्टोबर, कटक
तिसरा सामना : 8 ऑक्टोबर, कोलकाता
वनडे सीरीज
पहिला सामना : 11 ऑक्टोबर, कानपूर
दूसरा सामना : 14 ऑक्टोबर, इंदूर
तिसरा सामना : 18 ऑक्टोबर, राजकोट
चौथा सामना : 22 ऑक्टोबर, चेन्नई
पाचवा सामना : 25 ऑक्टोबर, मुंबई
टेस्ट सीरीज
पहिला सामना : 5-9 नोव्हेंबर, मोहाली
दूसरा सामना : 14-18 नोव्हेंबर, बेंगलुरु
तिसरा सामना : 25-29 नोव्हेंबर, नागपूर
चौथा सामना : 3-7 डिसेंबर, दिल्ली
पुढील स्लाईडवर बघा, BCCI सिलेक्शन कमेटीचे फोटो... महेंद्रसिंह धोनी होता उपस्थित...