आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI To File Affidavit In Supreme Court On Lodha Report

सर्वोच्च न्यायालयाच्या शिथिल भूमिकेच्या प्रतीक्षेत बीसीसीआय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीसीसीआयच्या तातडीच्या सर्वसाधारण सभेने न्या. लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यास प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी सर्वोच्च न्यायालयाला कळवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सर्व सदस्यांच्या मनात भवितव्याबाबतची धाकधूक वाढली आहे. दुहेरी हिताचा मुद्दा, वयाची मर्यादा किंवा सरकारी पद आदी गोष्टींवरून आपली कारकीर्द तर संपणार नाही, या विवंचनेत बहुतेक सदस्य सध्या आहेत.

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या कार्यपद्धतीला शिस्त लावण्याचे कार्य यशस्वी होत असल्यामुळे काही बाबतीत कठोर शिफारशी शिथिल केल्या जाण्याची आशा सदस्यांना वाटते. दोन षटकांदरम्यान जाहिराती दाखवणे, ७० वयोमर्यादा वाढवणे, एक राज्य एक मत याबाबतही फेरविचार होऊ शकतो, अशी आशाही जाणकार सदस्यांना आहे.

न्या. लोढा यांची समिती त्याबाबत बीसीसीआयचे जाणकार व जुने सदस्य शरद पवार, श्रीनिवासन वा तत्सम सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. या जाणकारांकडून त्यांची मते जाणून मगच न्या. लोढा समिती विनंतीवर आपली मते देईल, असा अंदाज आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी राजवटीत अस्तित्वात असलेल्या मुंबई क्रिकेटचे मत कायम ठेवायचे का? किंवा विद्यमान संघटनांना आहे त्या स्थितीत ठेवून यापुढे एक राज्य एक मत, अशी कल्पना राबवायची का? अशी विनंती करण्यात येईल, असा अंदाज आहे. बीसीसीआयने आपल्या मिळकतीवर प्रचंड आघात होणाऱ्या २ षटकांमधील जाहिरात बंदीचा फेरविचार करावा, अशीही भूमिका घेतली आहे.

न्यायालय सत्यता तपासणार
बीसीसीआयच्या आक्षेपाची सत्यता पाहून सर्वोच्च न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिफारशींमधील शिथिलता विचार करण्यायोग्य वाटल्यास पुन्हा समितीकडे विचारणा करण्यात येईल.