आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI\'s Special General Meeting On October 4 To Pick New President

रविवारी BCCI ची बैठक, अध्‍यक्षपदी शशांक मनोहर यांची निवड निश्‍चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI)विशेष सर्वसाधारण बैठक 4 ऑक्‍टोबरला मुंबईमध्‍ये होणार आहे. या बैठकीत बोर्डांच्‍या नवीन अध्‍यक्षांची निवड केली जाणार आहे. उमेद्वारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर आहे.20 सप्‍टेंबरला जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्‍यानंतर BCCI चे अध्‍यक्षपद रिक्‍त झाले होते. तथापि, अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची निवड होण्‍याचे निश्‍चित झाले आहे.
शशांक मनोहर यांना सपोर्ट
शशांक मनोहर यांना BCCIचे सचिव अनुराग ठाकुर आणि शदर पवार यांचा सपोर्ट मिळाला आहे. शशांक मनोहर 2008 ते 2011 पर्यंत BCCI अध्‍यक्ष राहिलेले आहेत. सुत्रांच्‍या माहितीनुसार शरद पवार यांच्‍या समर्थनानंतर त्‍यांचे पदभार सांभाळणे निश्‍चित झाल्‍यासारखे आहे. त्‍यामुळे मनोहर यांना आता 29 पैकी 15 मते मिळणे निश्‍चित झाले आहे. दालमिया यांच्‍या निधनानंतर BCCIच्या अध्‍यक्षपदासाठी नवनवीन नावं पुढे आले. यामध्‍ये शरद पवार आणि माजी BCCI
अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे गट आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्‍या अध्‍यक्षपदी नुकतीच निवड झालेले सौरव गांगुली यांची यामध्‍ये महत्‍त्‍वाची भुमिका राहणार आहे, असेही सुत्रांकडून सांगण्‍यात येत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा.. कोण आहेत शशांक मनोहर.. गांगुली मनोहर यांच्‍यातील जुना वाद..