आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : पाहा युवराजची LIFE, मैदानावरच धरले होते सचिनचे पाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैदानावरच सचिन तेंडुलकरच्या पाया पडताना युवराज. हा फोटो 2014 चा आहे. - Divya Marathi
मैदानावरच सचिन तेंडुलकरच्या पाया पडताना युवराज. हा फोटो 2014 चा आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग आज 34वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 12 डिसेंबर, 1981 रोजी झाला. भारताने 2011 सालचा विश्वचषक जिंकला होता. त्यात युवराजसिंगचे फार मोठे योगदान होते. मात्र सध्या तो संघा बाहेर आहे. मात्र असे असले तरी, त्याने टी-20 वर्ल्ड कप-2016 साठी पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. त्याच्यात आजही एखादा सामने एकहाती खेचून आणण्याची क्षमता आहे.
युवीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याला त्याचे, बालपणीपासून ते आता पर्यंतचे काही निवडक फोटो दाखवणार आहोत. जे तुम्ही क्वचितच पाहिेले असतील.
युवराजने टी-20, एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे. एवढेच नाही तर त्याच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत की, जे सहजा सहजी तोडणे कुणालाही शक्य होणार नाही. त्याच्या नावे टी-20 सामन्यात सलग सहा षटकार मारण्याचाही विक्रम आहे. हा विक्रम त्यांने इंगलंडविरुद्ध केला होता. या सामन्यात त्याने ब्रॉडला सलग सहा षटकार खेचले होते. विश्वचषकाविषयी बोलायचे तर, विश्वचषकातील भारताच्या विजयात त्याचे योगदान फार मोठे आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही.
युवराजला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा...
पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराजसिंगच्या बालपणीपासून ते आता पर्यंतचे काही निवडक PHOTOS, दे तुम्ही करूच शकणार नाही MISS...