आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अवघ्या 26 व्या वर्षीच अझारेंका झाली 160 कोटींची मालकीण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिक्टोरियाच्या याच फोटोला सोशल साइट्सवर मिळाले होते हजारो लाइक्स . - Divya Marathi
व्हिक्टोरियाच्या याच फोटोला सोशल साइट्सवर मिळाले होते हजारो लाइक्स .
ऑलिम्पिक 2012 च्या टेनिस स्पर्धेत दोन मेडल्स, मिक्स डबल्समध्ये गोल्ड आणि सिंगल्समध्ये ब्रॉन्ज मेडल. हो, आपण बोलत आहोत बेलारूच्या व्हिक्टोरिया अझारेंकाविषयी. तिने ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी करत दोन मेडल्स बेलारूसच्या पारड्यात टाकले आहेत. टेनिस वर्ल्डची सर्वात सुंदर महिला खेळाडूंत सहभागी असलेली व्हिक्टोरिया अझारेंकाने शुक्रवारी 26वा जन्मदिवस (31 जुलै, 1989) सेलिब्रेट केला. व्हिक्टोरिया अझारेंका 25 मिलियन म्हणजेच 160 कोटी रुपयांची मालकीण आहे. माजी वर्ल्ड नंबर एक महिला टेनिस स्टार व्हिक्टोरिया अझारेंकाला फोर्ब्सने सर्वाधिक कमाई आसणाऱ्या महिला खेळाडूच्यां टॉप-10 लिस्टमध्ये सामिल केले होते. तिला या यादीत 6 वे स्थान देण्यात आले होते.
हॉकीने केली होती करिअरची सुरुवात.
व्हिक्टोरिया अझारेंकाच्या बाबतीत फार कमी लेकांना माहिती आहे. की, तिने तिच्या करिअरची सुरूवात टेनिसने नाही तर हॉकीने केली होती. व्हिक्टोरिया 15 वर्षंची असतानाच तिची आई आपल्या मैत्रिनीचा पती असलेल्या निकोलाई खाबिबुलिन याच्यांकडे तिला घेऊन गेली होती. जे हॉकी कोच होते. त्यांच्या मार्गदर्शनात व्हिक्टोरियाने बऱ्याच दिवस हॉकी खेळले. याच काळात तिची आई मोनॅको गेली.
2003 मध्ये वळला टेनिसकडे मोर्चा:
मोनाको गेल्यानंतर अझारेंकाला हॉकीमध्ये हवेतसे यश मिळाले नाही. मग काय येथूनट सुरूवात झाली एका टेनिर स्टारची . तिने नोव्हेंबर, 2003 मध्ये इस्रायल आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन) टूरच्या दरम्यान डेब्यू केले. तिने तिच्या करियरमध्ये 17 WTA आणि एक आयटीएफ किताब जिंकला.

टेनिस किताब :
- ग्रँड स्लॅम : सिंगल्स : विजेता : ऑस्ट्रेलियन ओपन (2012, 2013), उपविजेता: यूएस ओपन (2012, 2013).

- डबल्स: उपविजेता: ऑस्ट्रेलियन ओपन-2008, फ्रेंच ओपन-2009 आणि ऑस्ट्रेलियन ओपन-2011.
-मिक्स डबल्स: विजेता : यूएस ओपन (2007) आणि फ्रेंच ओपन (2008), उपविजेता : ऑस्ट्रेलियन ओपन (2007).

पुढील स्लाइड्सवर पाहा, माजी वर्ल्ड नंबर वन वुमन टेनिस स्टार व्हिक्टोरिया अझारेंकाचे काही निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...