मुंबई- माजी इंडिअन क्रिकेटर विनोद कांबळी हा एक मल्टी टॅलेंटेड आहे. तो एक राजकारणी, एक टीव्ही कलाकार, एक फिल्म स्टार आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर या सर्व गुणांनी परिपूर्ण आणि परिचित आहे. विनोदचा विवाह ग्लॅमरस मॉडेल अँड्रिआबरोबर झाला आहे. त्याची पत्नी अँड्रिआ ही दिसायला अतिशय सुंदर आहे.
विनोदने जीवनात अनेक छोटो-मोठे चढ-उतार अनुभवले. 2009 मध्ये विनोदने राजकारणातही नशीब आजमावले. त्याने मुंबईतून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूकही लढली. मात्र यात त्याला अपयश आले. त्याने बॉलिवुडच्या "पल पल दिल के पास' आणि अनर्थ या सिनेमांतही भूमिका साकारल्या.
विनोद घरा-घरात छोट्या पडद्यांवर म्हणजेच टीव्हीवरही दिसून यायचा. तो तेव्हा मीस इंडियामध्ये भूमिका करायचा. सध्या विनोद कांबळी स्पोर्ट चॅनेलवर क्रिकेट सामन्यांचे विश्लेषण करतो.
विनोद कांबळीची पत्नी अँड्रिया हेविट ही एक प्रसिद्ध फॅशन मॉडेल आहे. त्यांना जून 2010 मध्ये एक मुलगाही झाला. त्याचे नाव जिजस ख्रिस्तिआनो असे आहे.
भारताचा उत्कृष्ट कसोटी फलंदाज राहिलेल्या विनोद कांबळीला 29 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबईच्या लिलावती रुग्नालयात भरती करावे लागले होते. त्याला ह्रदयविकाराचा त्रास झाला होता.
कांबळी एकदा चेंबूरहून बांद्र्याला ड्रायव्हींग करत होता. मात्र त्याला अचानक त्रास होऊ लागला. त्याने रस्त्यातच कार थांबवली. तेव्हा सुजाता पाटील या महिला पोलिसाने त्याला पाहिले. तिने त्याला तातडीने लिलावती रुग्णालयात नेले.
रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कांबळी हा अंडर ऑब्झरवेशन होता आणि त्याच्या प्रकृतीची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्यावर बर्याच टेस्टदेखील करण्यात आल्या. जुलै 2012 मध्ये कांबळीची अँजिओप्लास्टीदेखील झाली. त्याच्या दोन धमन्यांमध्ये ब्लॉकेज अढळून आले होते.
पुढील स्लाईडवर बघा, विनोद कांबळी आणि अँड्रिआ यांचे ग्लॅमरस फोटो....