आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Talks About His Looks, Women And Sexual Competitions With His West Indies Teammates

पहिल्या गर्लफ्रेंडला सोडल्यानंतर झाला प्लेबॉय, 500 महिलांसोबत केली शय्यासोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीनो बेस्ट (उजवीकडे) कायम पार्टीमध्ये दिसतो. तो नाइट लाइफचा चाहता आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
टीनो बेस्ट (उजवीकडे) कायम पार्टीमध्ये दिसतो. तो नाइट लाइफचा चाहता आहे. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - वेस्ट इंडिजचा वादग्रस्त क्रिकेटर टीनो बेस्टने त्याच्या आयुष्यासंबंधीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने म्हटले आहे, की आतापर्यंत 500 ते 650 मुलींसोबत शय्यासोबत केली आहे. 34 वर्षांच्या या बॉलरने 'माइंड द विंडो-माय स्टोरी ' या ऑटोबायोग्राफीमध्ये पार्टनर, क्रिकेट आणि आयुष्य विस्तृतपणे मांडले आहे. मैदानावरील त्याचा वावर फ्लिंटॉफ, आफ्रिदी सारख्या खेळाडूंनी पंगा घेतल्याने वादग्रस्त राहिलेला आहे.
टीनो लिहितो - मी मुलींवर प्रेम करतो आणि त्या माझ्यावर. मला वाटते की डोक्याचा चमन झालेला मी जगातील बेस्ट ब्लॅक लुकिंग पुरुष आहे. लोक विनोदाने मला ब्लॅक ब्रॅड पिट देखिल म्हणतात.

- टीनोच्या ऑटोबायोग्राफीबद्दल असा दावा केला जात आहे, की त्याने त्याच्या आयुष्यातील सर्व वादांबद्दल यात सविस्तर लेखन केले आहे. पुस्तकाचा काही भाग मेल ऑनलाइनवर प्रकाशित झाला आहे.
- त्याने या पुस्तकात त्याचे पहिले प्रेम मेलिसाचाही उल्लेख केला आहे, तिच्यापासून त्याला एक मुलगी आहे.
- त्याने म्हटले आहे, की तिच्यासोबतच संबंध संपुष्टात आल्यानंतर मी प्लेबॉय झालो.
- हे पुस्तक या महिन्याच्या शेवटी बाजारात येणार आहे.

कोण आहे टीनो बेस्ट ?
- टीनो जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
- त्याने वेस्ट इंडिजकडून 25 कसोटी सामने खेळले असून त्यात 57 विकेट मिळविल्या आहेत.
- मैदानावर त्याने इंग्लंडचा ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ पासून पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदीसह स्वतःच्या देशाच्या केरन पोलार्डसोबतही वाद घातला आहे.
- टीनोने शेवटचा कसोटी सामना 2013 न्यूझीलंडविरुद्ध हेमिल्टनमध्ये खेळला होता.
- त्याने शेवटचा वनडेही न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता. 2014 मध्ये नेल्सनमध्ये तो खेळला होता.
- तेव्हापासून तो टीममधून बाहेर आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बेस्टचे फोटोज्...