आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेत सात वर्षे फुटबॉल खेळत होता बेयरस्ट्रो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जॉनी बेयरस्ट्रो यावर्षी सर्वाधिक चर्चेत राहणारा खेळाडू आहे. त्याने यष्टिरक्षणाचे बरेच विक्रम मोडले. शिवाय एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक धावा काढण्यासह सर्वाधिक अर्धशतकेसुद्धा ठोकण्याची कामगिरी केली आहे. २६ सप्टेंबर १९८९ रोजी जन्मलेल्या जॉनी बेयरस्ट्रोला बालपणापासून खेळाला अनुकूल वातावरण मिळाले. कारण त्याचे वडील आणि चुलत भाऊ दोघेही क्रिकेटपटू होते. वडील डेव्हिड बेयरस्ट्रो इंग्लंडकडून विकेटकीपर म्हणून खेळलेसुद्धा. तर भावाने कौंटीत डर्बीशायरकडून मैदान गाजवले. क्रिकेटचे धडे त्याला कुटुंबातच मिळाले. त्याला आधी क्रिकेटपेक्षा इतर खेळात अधिक रस होता. शाळेत तो फुटबॉल, रग्बी अणि हॉकी खेळत असे. त्याने सात वर्ष लीड्स युनायटेड संघाकडून फुटबॉल खेळताना मैदान गाजवले. तो यॉर्कशायरच्या संघाकडून रग्बी खेळायचा. शिवाय लिड्सच्या हॉकी संघातही त्याचा समावेश होता. डॅनी रोस आणि फॅबियन डेल्फसारखे मोठे फुटबॉलपटू त्याचे सहकारी होते. तो ८ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी नैराश्येमुळे आत्महत्या केली. या घटनेचा जॉनीला धक्का बसला आणि तो काही काळ क्रिकेटपासून दूर झाला. मात्र, आईने समजूत काढल्यानंतर तो पुन्हा खेळू लागला. तो वयाच्या १५ वर्षांपर्यंत क्रिकेटशिवाय फुटबॉल, रग्बी आणि हॉकी खेळायचा. यानंतर त्याने क्रिकेटकडे गांभीर्याने बघण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये सेंट पीटर्स स्कूलकडून त्याने ६५४ धावा काढल्या, तेव्हा त्याच्यावर पहिल्यांदा जगाची नजर पडली. यानंतर त्याला पहिले यंग विस्डन क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला. २०१० मध्ये तो यॉर्कशायरचा नियमित खेळाडू झाला. त्या सत्रात त्याने १६ सामन्यांत ९१८ धावा ठोकल्या.२०११ मध्ये तो आपल्या संघाचा असा एकमेव खेळाडू होता, ज्याने सत्रात १ हजारपेक्षा अधिक धावा काढल्या. याच वर्षी त्याला आपला पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला. भारताविरुद्ध या सामन्यात त्याने २१ चेंडूंत ४१ धावा काढल्याने तो मॅन ऑफ द मॅच ठरला. पुढच्या वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध लॉर्ड््सवर कसोटी पदार्पण केले. आता तो इंग्लंडच्या मधल्या फळीचा भक्कम आधारस्तंभ झाला आहे. अनेक वेळा त्याने संघाला संकटातून बाहेर काढले. खेळाशिवाय जॉनीला संगीत आणि जलतरणाचा छंद आहे. फ्री टाइममध्ये तो मित्रांसोबत फिरतो आणि चित्रपट पाहतो. तो अनेक वेळा जंगलात जाऊन पार्टी करतो. वडिलांच्या निधनानंतर तो आईच्या खूप जवळ आला. दुसऱ्या देशांची संस्कृती जाणून घेण्यात त्याचा रस असतो. यासाठी तो वाचनही करतो.
पुरस्कार
{यंग विस्डन स्कूल क्रिकेटर ऑफ द इयर
{क्रिकेट रायटर्स क्लब यंग क्रिकेटर ऑफ द इयर
{एनबीसी डेनिस कॉम्पटन अवॉर्ड
विक्रम
{ एका कॅलेंडर वर्षांत २०१६ मध्ये सर्वाधिक १३०६ धावा काढणारा यष्टिरक्षक
{ यष्टिरक्षक म्हणून एका वर्षात सर्वाधिक १० अर्धशतके
{ वर्षात १००० पेक्षा अधिक धावा काढणारा दुसरा यष्टिरक्षक
बातम्या आणखी आहेत...